शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:45 IST

मित्राची मस्करी केल्याच्या व पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सराईताने तरुणावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देयाप्रकरणी नऊ ते दहा जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : मित्राची मस्करी केल्याच्या व पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सराईताने तरुणावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार खडकी येथे शनिवारी (१६ जून) रात्री दहाच्या दरम्यान घडला.     याप्रकरणी नऊ ते दहा जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्विन उर्फ सोन्या बळीराम साठे उर्फ  बिलाड, आण्या भिसे, प्रकाश आवळे, निलेश उर्फ सोनू नेसमनी (सर्व रा. खडकी) यांच्यासह पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गणेश सुंगत ( वय २४, खडकी) या तरुणाने तक्रार दिली आहे. यातील आश्विन, बिलाड याच्यावर यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सुंगत व त्याचे मित्र स्थानिक नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांच्या वस्तीत राहण्यास असलेला आश्विन ,बिलाड, अण्या भिसे, प्रकाश आवळे, निलेश नेसुमणी व इतर पाच ते सहा जण समोरून येत होते. त्यांच्यासोबत गणेश याच्या ओळखीचा मित्र लखन परदेशी येताना दिसला. त्यामुळे फिर्यादीचा मित्री विठ्ठल बिडलाना त्याला पाहून मस्करीत म्हणाला की, तू यांचे सोबत पण फिरतो का? त्यावेळी बिलाड याने यापूर्वी त्यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा व मस्करीचा राग मनात धरून गणेश व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्याला शिवीगाळ का करतो असे विचारल्यावर बिलाड व त्याचे साथीदार गणेश व त्याच्या मित्रांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण करू लागले. त्यानंतर बिलाड याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून ते लोड करत गणेश सुंगत व त्याच्या मित्रांच्या दिशेने रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस