नीरेतील खताच्या दुकानाला शोकॉज नोटीस.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:44+5:302021-07-15T04:09:44+5:30
नीरा : खरीप हंगामामध्ये खते आणि बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असे पुरंदर कृषी विभागाकडून सांगण्यात आले होते. ...

नीरेतील खताच्या दुकानाला शोकॉज नोटीस.
नीरा :
खरीप हंगामामध्ये खते आणि बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असे पुरंदर कृषी विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र आज बुधवारी नीरा येथील अरविंद फर्टिलायजर या खत विक्रेत्याने गुळूंचे येथील दोन शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नसल्याचे सांगत परत लावले होते. याची तक्रार शेतकऱ्यांनी पुरंदर पंचायती समितीच्या महिला कृषी अधिकाऱ्यांकडे केली.या दुकानदाराला शोकॉज नोटीस काढली आहे.
महिला कृषी अधिकाऱ्यांनी दुपारी या दुकानाला भेट दिली असता मुबलक प्रमाणात युरिया शिल्लक असूनही या दुकानदाराने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली व हा युरियाचा साठा शेजारील गावातील मोठ्या शेतकऱ्यांचा व नीरेतील लोकप्रतिनिधींचा असून तो देता येत नाही असे सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईचे खडे बोल सुनावल्यावर सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया देण्यास सुरवात केली.
गुळूंचे येथील एका शेतकऱ्याने नीरेमधील अरविंद फर्टिलायझर या दुकानदारांची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामध्ये युरिया मिक्शचर उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना दिले जात नाही असे त्यांनी सांगितले. दुकानदारांकडून युरिया देण्यासाठी दुजाभाव केला जातो सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया दिला जात नाही जे मोठे नामांकित शेतकरी आहे त्यांच्यासाठी साठा शिल्लक ठेवला जातो, अशी तक्रार गुळुंचे येथील अक्षय निगडे व नितीन निगडे या शेतकऱ्यांनी आधी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे व नंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे केली.
या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी त्या दुकानात भेट दिली असता त्यामध्ये युरिया साठा उपलब्ध असूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिले जात नाही असे आढळून आले. कृषी अधिकाऱ्यांच्या समोरही दोन शेतकऱ्यांना उद्या या असे म्हणून सांगण्यात आले. युरियाचा साठा शिल्लक असूनही शेतकऱ्यांना का दिली जात नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे. हा सर्व प्रकार कृषी अधिकाऱ्यांच्या समोर निदर्शनास आला असून त्या दुकानदारावर कारवाई होणार का, याबाबतीत सर्वांचे लक्ष वेधले आहे
एस. जी. पवार.
(कृषी अधिकारी पंचायत समिती पुरंदर)
गुळूंचेच्या शेतकऱ्यांनी नीरेतील खताच्या दुकानदारांकडून युरिया दिला जात नसल्याची तक्रार आली होती. अरविंद फर्टिलायजरच्या मालकाने युरिया देण्यास टाळाटाळ करत होते. प्रत्यक्ष पाहणी केली असता गोदामात युरीय शिल्लक होता. या दुकानदाराला शोकॉस नोटीस काढली आहे. त्यांच्याकडे १३९ पिशव्या युरिया शिल्लक आहे. आज त्यांनी तो विक्री केला व उद्याही आधार कार्ड दाखवून विक्री केली जाईल."
नीरा येथील खतविक्रेता महिला कृषी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालताना.