क्षेपणास्त्र व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
By Admin | Updated: May 9, 2017 04:10 IST2017-05-09T04:10:57+5:302017-05-09T04:10:57+5:30
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये येत्या ११ ते १४ मे २०१७ दरम्यान पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो भरणार आहे. या संमेलनामध्ये

क्षेपणास्त्र व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये येत्या ११ ते १४ मे २०१७ दरम्यान पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो भरणार आहे.
या संमेलनामध्ये देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र, डीआरडीओने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जवळून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्याचबरोबर मेक इन इंडिया अभियानांतर्गत विकसित केलेली हॉवित्झर श्रेणीतील ह्यभारत ५२ह्ण ही अत्याधुनिक तोफ पुणेकरांना प्रथमच प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व विज्ञानभारतीचे अध्यक्ष विजय भटकर, आरएनडीएसचे संचालक व्यंकटेश परळीकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे, राष्ट्रीय संघटनमंत्री जयंत सहस्त्रबुध्दे, शेखर मांडे, सहकार्यवाह मुकुंद देशपांडे यांनी याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
सायन्स एक्स्पो ११ ते १४ मे दरम्यान सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. भारतीय विज्ञान संमेलनात सहभागी होण्यासाठी मात्र नोंदणी आवश्यक आहे.
सायन्स एक्स्पोचे उदघाटन ११ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, भारतीय विज्ञान संमेलनाचे उदघाटन १२ तारखेला सकाळी दहा वाजता होईल. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.