भाजपाला त्यांची जागा दाखवा : अजित पवार
By Admin | Updated: February 17, 2017 04:56 IST2017-02-17T04:56:12+5:302017-02-17T04:56:12+5:30
बोपखेल रस्त्याचा वाद झाला, त्या वेळी सर्वसामान्य नागरिक लाठ्या-काठ्या खात होता आणि ज्यांना आता जनसेवेचा पुळका आला

भाजपाला त्यांची जागा दाखवा : अजित पवार
भोसरी : बोपखेल रस्त्याचा वाद झाला, त्या वेळी सर्वसामान्य नागरिक लाठ्या-काठ्या खात होता आणि ज्यांना आता जनसेवेचा पुळका आला आहे, ते त्या वेळी कुठे गेले होते. अशा या भाजपाला धडा शिकवा. त्यांना त्यांची योग्य जागा येत्या निवडणुकीत दाखवून द्या, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर बोपखेल येथील सभेत केली.
या वेळी वसंत लक्ष्मण इंगळे , बाळू गंगाराम लांडे , वृषाली समीर झपके-घुले, कल्पना चंद्रकांत वाळके या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाने शहराला आपले घर मानून सर्वसामान्यांच्या अडचणी आपल्या समजून काम केले आहे. सत्तेत येण्यापूर्वी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याचे, रेड झोन प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण करता आले नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वाट्याला फार काही येईल, असे वाटत नाही.
या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विजय लोखंडे, चंद्रकांत वाळके व वसंत इंगळे, बाळू लांडे, वृषाली झपके-घुले, कल्पना वाळके उपस्थित होते.(वार्ताहर)