संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST2020-12-15T04:29:35+5:302020-12-15T04:29:35+5:30

-- थुंकल्याच्या जाब विचारल्याने मारहाण मंचर : अंगणात थुंकल्याचा जाब थुंकणाऱ्यांना विचारल्यामुळे थुंकणाऱ्यांनीच जाब विचारणाऱ्यास बेदम मारहाण केली. ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

--

थुंकल्याच्या जाब विचारल्याने मारहाण

मंचर : अंगणात थुंकल्याचा जाब थुंकणाऱ्यांना विचारल्यामुळे थुंकणाऱ्यांनीच जाब विचारणाऱ्यास बेदम मारहाण केली. ही घटना वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमरासा घडली. याबाबत शंर बाबुराव लोखंडे, मारुती बाबुराव लोखंडे, राजेंद्र शंकर लोखंडे, विनायक मारुती लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रखरणी पांडुरंग बापू राजगुरू यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

--

पैसे देण्याच्या कारणावरून एकास मारहाण

दौंड : उधार घेतलेले पैसे परत दिल्यावरही ते पैसे दिलेच नाही त्यामुळे उधारीचे पैसे परत दे असे म्हणत मावस भावानेच मारहाण केली. ही घटना मलठण (ता. दौंड) येथे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजी महादू कदम, बबन शिवाजी कदम, रामभाऊ शिवाजी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दत्तू भाऊ दळवी यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

--

कुपन बांधण्याच्या कारणावरून महिलेस मारहाण

वडगाव निंबाळकर : घराभोवती कुंपण करण्यासाठी सामान आणून टाकल्यावर शेजाऱ्यांनी त्यावरून भांडण करत या जागेवर कुंपन केल्यास पाडून टाकू असे म्हणत महिलेस मारहाण केली. ही घटना वडगाव निंबाळकर पाढरी (ता. बारामती) येथे घडली. याबाबत सुनील मोहन गायकवाड, कुसुम मोहन गायकवाड, रोहिनी सुनिल गायकवाड, स्नेहा सुनिल गायवकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आशा कांतीलाल गायकवाड यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली.

---

Web Title: Short story