शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हमीद दलवाईंवर लघुपट, अर्धशतकापूर्वीचा धर्मसंघर्ष आता पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:35 IST

स्वत:च्या रूढिग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वधर्माबरोबर सुरू केलेला व त्यातून अन्य धर्मीयांबरोबरही झालेला संघर्ष आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर आला आहे.

पुणे: स्वत:च्या रूढिग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वधर्माबरोबर सुरू केलेला व त्यातून अन्य धर्मीयांबरोबरही झालेला संघर्ष आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर आला आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक असलेल्या हमीद दलवाई यांची जीवनगाथा यातून नव्या पिढीसमोर साकार होईल. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी यात दलवाई यांची भूमिका केली असून, चरित्र अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.मंडळाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशन सभागृह, गांजवे चौक इथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट’ असे या लघुपटाचे नाव आहे. हमीद यांच्या जीवनसंघर्षाचे चित्रीकरण, यात प्रसंग, मुलाखती यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याचबरोबर आंततराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक डॉ. झीनत शौकत अली, दिल्लीची धनक फॉर ह्युमॅनिटी ही समतावादी संघटना व शाहीर बशीरभाई मोमीन कवठेकर यांचा या वेळी वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.विशेषांकमंडळाचे मुखपत्र असलेल्या मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेच्या वर्धापन दिन विशेषाकांचे प्रकाशनही या वेळी होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. लघुपटाचे सादरीकरण सायंकाळी ५ वाजता सुरू करण्यात येईल. त्यानंतर कार्यक्रम होईल असे संयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणे