शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

दादा,दोन महिन्यांपासुन दुकानं बंद, आता उघडण्याची परवानगी द्या : बारामतीत व्यापाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:10 IST

मागील दोन महिन्यापासुन ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बारामती शहरातील सर्व दुकाने बंद आहेत.

बारामती: बारामती शहरात कोरोना संकट रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातुन बाहेर काढण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्यात आले आहे.

याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी पवार यांना निवेदन दिले आहे.त्यानुसार मागील दोन महिन्यापासुन राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बारामती शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. सर्व व्यापाऱ्यांनी पूर्णपणे या मोहिमेत सहभाग घेतला.तसेच ही मोहीम यशस्वी होण्यासाठी खंबीर साथ दिली.

परंतु, या २ महिन्यात बंदमुळे व्यापाऱ्या ची अडचण देखील वाढलेली आहे. या दोन महिन्यात व्यापार बंद होता. मात्र, कामगारांचा पगार,बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स,वीजबिल,टेलीफोन बिल,जागा भाडे,नगरपरिषद टॅक्स आदी खर्च मात्र सुरुच होते.या सर्व बाबींमुळे व्यापारी हतबल झाला आहे.आता ही व्यापारी अडचण व्यापारी पेलु शकत नाही. त्यामुळे १ जूनपासुन सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. व्यापारी सर्व नियमांचे पालन करुन व्यापार सुरु करतील, अशी मागणी करण्यात आली आहे.——————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीbusinessव्यवसायAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या