पुणेकरांच्या गर्दीने शॉपिंग महोत्सव फुलला
By Admin | Updated: February 8, 2016 02:17 IST2016-02-08T02:17:01+5:302016-02-08T02:17:01+5:30
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पुणेकरांनी संधीचा फायदा घेऊन शॉपिंग फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद लुटला. लहानांपासून ते वृद्धांपर्यत प्रत्येक जण लोकमत शॉपिंग फेस्टिव्हलचा आनंद घेत होते.

पुणेकरांच्या गर्दीने शॉपिंग महोत्सव फुलला
पुणे: रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पुणेकरांनी संधीचा फायदा घेऊन शॉपिंग फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद लुटला. लहानांपासून ते वृद्धांपर्यत प्रत्येक जण लोकमत शॉपिंग फेस्टिव्हलचा आनंद घेत होते. प्रत्येक वस्तूवर विविध सवलती असल्यामुळे शॉपिंगचा मोह अनेकांना आवरता आला नाही.
लोकमतच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. गृहोपयोगी वस्तूंपासून ते घरांमध्ये फर्निचर कसे असावे, तसेच बाल्कनी मध्ये आर्टिफिशियल ग्रास कसे बसविता येईल याची माहिती पुणेकरांना या प्रदर्शनात मिळाली आहे. तसेच एकावर एक फ्री अशा वस्तूंची आॅफर, टू व्हीलर-फोर व्हीलरच्या विविध स्किम, तसेच पुणेकरांसाठी एक दिवसाच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी आकर्षक आॅफर देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा अनेक वस्तू एकाच छताखाली असल्यामुळे प्रत्येक जण सोबत समाधान घेऊन जात होता.
महिलांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शॉपिंग आणि आपल्या आवडीच्या अनेक वस्तू जर एकाच ठिकाणी मिळत असतील तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो, हे चित्र लोकमतच्या शॉपिंग महोत्सवात पाहायला मिळाले. आकर्षक असे एम्ब्रॉयडरी केलेले कुर्तीज, पंजाबी, राजस्थानी गुजराती साड्या, जूटच्या चप्पल, ज्वेलरी, विविध आकाराच्या हॅण्डमेड पर्स अशा अनेक वस्तू येथे असल्याने रविवारच्या सुट्टीमुळे पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
दिल्ली, राजस्थान, जम्मू-काश्मीर अशा विविध राज्यांतील विविध प्रकारचे ड्रेस, साड्या, कुर्तीज या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. पुणेकरांसाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे मनसोक्त खरेदीचा आनंद पुणेकर लुटत आहेत. तसेच येत्या मंगळवारपर्यंत ही संधी पुणेकरांना उपलब्ध असणार आहे आणि या प्रदर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. अस्सल खवय्ये असलेल्या पुणेकरांना गोड आंबा लोणचे, गोड लिंबू लोणचे, मुरंबा, हळद लोणचे, पालक, बिट, पोहा, मेथी, उडीद असे विविध पापडाचे प्रकार येथे उपलब्ध आहेत तसेच शेंगदाणा, कडीपत्ता, जवस अशा विविध चटण्या त्याचबरोबर अस्सल कोल्हापुरी मसाल्याची मेजवानी या महोत्सवात चाखायला मिळत आहे. येत्या मंगळवारपर्यंत शॉपिंगचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे.गुडविल मार्केटिंग
या दालनामध्ये महिलांसाठी सिल्की मिल्की सारीज आहेत. ही साडी दोन्ही बाजूने नेसता येते. हे या दालनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. त्याचबरोबर भरजरीयुक्त साडी, बांधणी, शिफॉन, कॉटनच्या साड्याही उपलब्ध आहेत. तसेच कुर्तीज, लहान मुलांचे कपडे, पुरुषांसाठी शर्ट, शेरवानीदेखील आहे. या प्रदर्शनानिमित्त ४० टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे.
राज सुपर व्हाईट सोप
या स्टॉलमध्ये विविध प्रकारचे सोप व घर साफ करण्यासाठी विविध प्रकारचे फिनेलही उपलब्ध आहे. यामध्ये सोप, डस्ट फ्री झाडू, कडूलिंबाचे फिनेल, निरमा, प्रीमियम क्वॉलिटी डस्टर आदी प्रकार उपलब्ध आहे. त्यामुळे दरवर्षी हा स्टॉल ग्राहकांच्या पसंतीस उतरतो.
राजस्थानी हॅण्डलूम
तरुणींना थोडे हटके राहायला आवडते. नेहमीच्या वस्तू वापरून त्यांना कंटाळा येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी राजस्थानी पाऊच, क्लच, बॅग्स, कॉटन बॅट सीट, झोला, मोबाईल कवर, पासपोर्ट साईज बॅग आदी गुजराती स्टाईल वस्तू या स्टॉलवर उपलब्ध आहेत. तसेच घराची सजावट करण्यासाठी दरवाजाचे तोरण, वॉलहँगिंग, कुशन कवर, पिलो कवर अशा विविध वस्तू हॅण्डवर्क केलेल्या आहेत.
देशी गावरान
या स्टॉलवरती विविध प्रकारचे लोणची पाहायला मिळतात. यामध्ये छुंदा, गोड आंबा लोणचे, गोड लिंबू लोणचे, मुरंबा तसेच तिखट गाजर लोणचे, मिरची लोणचे, आरोग्यासाठी गुणकारी असे हळदीचे लोणचे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पालक, बीट, पोहा, उडीद असे विविध प्रकारचे चवीयुक्त पापड उपलब्ध आहेत. तसेच शेंगदाणा, जवस, कारळे, कडीपत्ता अशा विविध चटण्यांचे प्रकार येथे मिळतात.
अमृता स्टाईल स्टॅक
या दालनामध्ये महिलांना आॅफिसला जाण्यासाठी किंवा समारंभाला जाण्यासाठी उत्कृष्ट क्वालिटीच्या विविध आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध वारली आर्ट, फॅन्सी ब्रोकेड, पैठणी, जरी, बॉर्डर खणाच्या पर्स आणि बॅग्ज आहेत. यामध्ये टिफीन बॅग, राऊंड पर्स, ज्वेलरी बॅग्ज, हॅण्डपर्स उपलब्ध आहेत.
फॅशन आॅन
या दालनामध्ये तरुणींना आकर्षित करतील असे वेस्टन, प्लाझो, श्रग, जॅकेट, विन्टर टी शटर््स, वॉर्म टी शर्ट्स, स्कर्ट, डिझायनर गाऊन असे विविध प्रकार या ठिकाणी तरुनींना आकर्षित करतात. यांच्या किमती २५०पासून ते २५०० पर्यंत आहेत. त्यामुळे तरुणींची गर्दी या स्टॉलकडे दिसते.
जूट चप्पल
हॅण्ड मेड जूट चप्पल ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. या जूट चपलांमध्ये मोजडी, साधी चप्पल असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या साईजच्या जूट चप्पल इथे पाहायला मिळतात. त्यामुळे जूट चप्पल पाहण्यासाठी ग्राहक गर्दी करीत आहेत. या चप्पलवरती या प्रदर्शनानिमित्त डिस्काऊंट आहे.
गोदरेज इंटेरियर
घर आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येक जण फर्निचर खरेदी करत असतो. अशाच विविध प्रकारचे फर्निचर या दालनात ग्राहकांना पाहायला मिळतात. या होम फर्निचरमध्ये स्टोर वेल्स कबर्ड, बेड्स, सोफा सेट, डायनिंग मेंटरेस, लहान मुलांसाठी स्टडी टेबल्स, सोफा कमबेड, मॉड्युलर सोफा, मॉड्युलर वॉर्डरोब, किड्स बेड, बिन बॅग असे विविध हटके आणि आकर्षक फर्निचर या दालनात पाहायला मिळतात. तसेच बजाज फायनान्सची १ रुपया भरून कोणतीही वस्तू बुक करण्याची स्किम या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात या स्किमचा फायदा उचलत आहेत.
व्याधीमुक्ती अभियान
या स्टॉलमध्ये कॅन्सरवरील आजारासाठी गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. हळदी करफ्युमिन हे औषध कॅन्सरसाठीसाठी उपयुक्त आहे. तसेच हे औषध कॅन्सरसहित इतर कोणत्याही रोगासाठी रामबाण औषध ठरते. तसेच महिलांसाठी नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनेही उपलब्ध आहेत. ग्राहकांना या औषधावरती २० टक्के डिस्काऊंट आहे.
पटियालाशाही सूटहाऊस फुलकारी
ज्या मुलींना किंवा महिलांना पंजाबी ड्रेस घालायला आवडतात किंवा थोडी हटके स्टाईल करायला आवडते त्यांच्यासाठी फुलकारी सुट्स, ड्रेस, कुर्ती, जॅकेट्स, प्लाजो, वेगवेगळ्या डिझाईनमधील दुपट्टे, फुलकारी साडी असे विविध अॅम्ब्रायडरी प्रकारचे मटेरियल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
फ्रेंण्ड्स अॅण्ड कंपनी
या स्टॉलवरती विविध प्रकारचे मनुके ग्राहकांना पाहायला मिळतात. यामध्ये काळे मनुके विक्रीसाठी ठेवलेले आहेत. या मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हे मनुके आरोग्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते.
श्री विनायक एन्टरप्रायझेस
स्वयंपाक करताना गॅसची बचत करणारी जाळी या स्टॉलमधे उपलब्ध आहे. नॉन स्टीकच्या भाड्यांना तेल लावण्यासाठी सिलीकॉन ब्रश; तसेच मॅजिक स्पंज हा सगळे आॅइल डाग साफ करतो, तसेच २० टक्के पाणी शोषून घेतो. त्यामुळे ग्राहकांनी हा स्पंज घेण्यासाठी गर्दी केली होती.मिल्क मिक्स
या स्टॉलमध्ये घरच्या घरी बनविता येईल असे कोल्ड्रिंगची पावडर मिळते. यामध्ये बटरस्कॉच, केशरयुक्त पिस्ता, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बदाम, व्हॅनिला, मँगो पावडर उपलब्ध आहे. ही पावडर दुधात टाकून पिल्यास घरच्या घरी उत्तम कोल्ड्रिंग तयार होते. त्यामुळे हे कोल्ड्रिंग लहानांपासून ते मोठ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
समृद्धी स्टील व प्लॅस्टिक उत्पादन
या स्टॉलमध्ये चांगल्या दर्जाची आणि टिकाऊ अशा घरगुती उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत. यामध्ये सूप, बकेट, मग, टब , वॉश ब्रश, स्टुल, खराटे, चटई, झाडू आदी विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या स्टॉलकडे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.
हॅण्ड सेव्हिंग मशिन
घरच्या घरी एखाद्या ड्रेसला मशिन मारता यावी यासाठी हॅण्ड सेव्हिंग मशिन खूप उपयुक्त ठरते. तसेच छोटे-मोठे उसवलेल्या कपड्यांना या मशिनच्या साह्याने शिलाई मारता येते. ही मशिन बाजारात ३९९ रुपयाला उपलब्ध आहे. पण या प्रदर्शनानिमित्त ते ग्राहकांना डिस्काऊंटमध्ये ३०० रुपयाला उपलब्ध आहे.
खादी इंडिया
या स्टॉलमधे विविध प्रकारचे खादीचे शर्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरुष वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी या स्टॉलकडे दिसते. यामध्ये खादीचे शर्ट, खादीची कुर्ती, पायजमा, संग्राम शर्ट उपलब्ध आहेत. या शर्टच्या किमतीही प्रत्येकाला परवडतील अशा आहेत. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात खादीचे शर्ट खरेदी करीत आहेत.
ट्रेडिशनल फंड
इंडियन वेअर, वेस्टन वेअर, ज्वेलरी कुर्तीज, ड्रेसमेटरियल, शिफॉन, कॉटनमधे ड्रेस उपलब्ध आहेत; तसेच पार्टीवेअर स्कर्ट, वनपीस देखील उपलब्ध आहेत.
आर्टिफिशियल लॉन
आपल्या घरासमोर आकर्षक अशी हिरवळ असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे या स्टॉलमधे प्रत्येक व्यक्तीला आपल्या गॅलरीत, टेरेस, गार्डन मध्ये, स्विमिंग पूलच्या साइडनी अशा आर्टीफिशियल ग्रास बसविता येते. त्यामुळे आपल्या घराभोवतीचा परिसर अधिक आकर्षक आणि मोहक दिसतो, असे आर्टीफीशियल ग्रासचे वैशिष्ट्य आहे.
अखिलेश बेल्ट
या स्टॉलमध्ये तरुणांपासून ते तरुणीपर्यंत सगळ्यांसाठी आकर्षक असे विविध प्रकारचे बेल्ट उपलब्ध आहेत. यामध्ये लेदर आणि वूडलॅण्डचे बेल्ट उपलब्ध आहेत. तसेच लेदर अॅम्ड लेक्झीनचे वॉलेट आहेत. साईड बॅग्जसुद्धा उपलब्ध आहेत.
ए-वन लेडीज गारमेंट्स
या दालनामध्ये पटीयाला, चिकन टॉप, ब्रासोचे टॉप, लाँग कुर्ती, शिफॉन कुर्ती, लाँग पीस, स्कर्ट तसेच फॅन्सी टॉप, दुपट्टा असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. तसेच काही कुर्तीजवरती आकर्षक अशी एम्ब्रॉयडरी केलेल्या डिझाईन्सदेखील आहेत. त्यामुळे तरुणी या स्टॉलकडे गर्दी करतात.
कलासृष्टी आर्ट सेंटर
या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी हाताने बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये म्युरल वारली ट्रे, लमासा क्ले ज्वेलरी, हॅण्ड पेंटेड वॉल पेंटिंग, पेपर क्वालिंग फ्रेमस्, ग्लास पेंटिंग, लमासा इयरिंग, बेअरबेण्ड अशा विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत.
राज पेस्ट कंट्रोल
या स्टॉलमधे घरामध्ये पाली, झुरळे, उंदीर, मुंग्या, ढेंकणे झाली असतील, तर पेस्ट कंट्रोलच्याऐवजी लिक्विड मारले तरी यांचा नायनाट केला जातो; तसेच कपड्यांवरील डाग काढण्यासाठी स्टेन रिमूव्हरदेखील या स्टॉलवरती उपलब्ध आहे.
हरियाणा हॅण्डलूम
या स्टॉलवरती सर्व प्रकारच्या हरियाणा कॉटन पॅन्ट आहेत. यामध्ये नाइट पॅन्ट, बरमुडा, लॉन्ग पॅन्ट, थ्री-फोर्त असे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
श्याम काश्मिरी टॉप्स
या दालनात सर्व प्रकारचे काश्मिरी कुर्ती, पटीयाला, कॉलर कुर्ती, वूलन एम्ब्रॉयडरीचे टॉप, शॉर्टस, जीन्स, लेगीन्स आदी प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात; तसेच लहान मुलींचे आकर्षक असे काश्मिरी ड्रेस या दालनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. १५० पासून ते ६५० रुपयांपर्यंत या टॉप्सच्या किमती आहेत.
मल्टी स्कार्फ
लेडीज आणि जेन्ट्स अशा दोघांना वापरता येईल, असा मल्टिफक्शन स्कार्फ या स्टॉलवरती उपलब्ध आहे. हा स्कार्फ होजिअरी कॉटनपासून बनविण्यात आलेला आहे. हा स्कार्फ धूळ; तसेच उन्हापासून संरक्षण करतो. या स्कार्फची किंमत बाजारात १९९ रुपये आहे, पण या प्रदर्शनामध्ये तो ग्राहकाला १०० रुपये किमतीला उपलब्ध आहे.
ओमकार अॅप्लायन्सेस
या स्टॉलवरती आॅइल फ्री स्नॅकमेकर वरती पापड, कुरडई, वेफर्स, पॉपकॉर्न, साबूदाना, बुंदी, मका, चने, शेंगदाने तेलाचा वापर न करता, मस्त भाजून निघतात आणि हे आॅइल फ्री असल्यामुळे, आरोग्यासही फायदेशीर ठरते. त्यामुळे प्रत्येक ग्राहक मोठ्या उत्साहाने हे आॅइल फ्री मेकर खरेदी करतात.
साई एन्टरप्रायजेस
या स्टॉलवरती २ बर्नरस, ३ बर्नरस, ४ बर्नरस गॅसशेगडी उपलब्ध आहेत. यामध्ये काच गॅसशेगडी आणि स्टील गॅसशेगडी आहे. एक्सचेंज आॅफरमधे शेगड्या ग्राहकांना उपलब्ध आहेत; तसेच कोणत्याही गॅसशेगडी खरेदीवर एक मिक्सर फ्री दिला जाणार आहे.