दुकाने बंदला व्यापारी महासंघाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:50+5:302021-04-06T04:11:50+5:30
पुणे : पुणे शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे़ परंतु, पुण्यात रात्रीच ...

दुकाने बंदला व्यापारी महासंघाचा विरोध
पुणे : पुणे शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे़ परंतु, पुण्यात रात्रीच कोरोना कसा वाढतो यापाठीमागचा निष्कर्ष काही समजत नाही. असा प्रश्न उपस्थित करीत, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यापारी महासंघातर्फे बंदच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे़
महापालिकेने नवीन नियमावली जाहीर करून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे व्यापारी महासंघाने सोमवारी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यादरम्यान व्यापारी महासंघातर्फे पुण्यातील दुकानांना वेळ वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र प्रशासनाने आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे आता उद्यापासून शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले़ यात अत्यावश्यक सेवेतील दुकानांचा समावेश नसणार असल्याचे केवळ स्पष्ट केले़
याबाबत रांका म्हणाले, दिवसा शहरात जमावबंदी असली तरी एसटी बसेस, रिक्षा असे सर्व काही सुरळीत सुरू आहे. मात्र, रात्री संचारबंदी लागू केली आहे. नेमकं पुण्यात रात्रीच कोरोना कसा वाढतो यापाठीमागचा निष्कर्ष काही समजत नाही. त्यामुळे आम्ही उद्यापासून दुकाने बंद ठेवणार आहोत़ परंतु, सर्व जनतेचा, व्यापाऱ्यांचा या आदेशाला विरोध असल्याचे सांगत त्यांनी, सत्तेपुढे शहाणपण कोणाचे चालते असेही सांगितले आहे़