पूर्ववैमनस्येतून तरूणावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST2020-12-12T04:29:05+5:302020-12-12T04:29:05+5:30

पुणे : पूर्ववैमनस्येतून एका तरूणावर गोळीबार केल्याची घटना घडली. आंबेगाव खुर्द येथील हनुमाननगर परिसरातील गणेश मंदिराजवळ गुरूवारी रात्री दहाच्या ...

Shooting at a young man out of prejudice | पूर्ववैमनस्येतून तरूणावर गोळीबार

पूर्ववैमनस्येतून तरूणावर गोळीबार

पुणे : पूर्ववैमनस्येतून एका तरूणावर गोळीबार केल्याची घटना घडली. आंबेगाव खुर्द येथील हनुमाननगर परिसरातील गणेश मंदिराजवळ गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.दोन ते तीन गोळ्यांचे राऊंड फायर केल्यामुळे परिसरात घबराट पसरली.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सोळा ते सतरा जणांच्या टोळक्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सिद्दीक मौला शेख (वय १८, रा. शनिनगर आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व आरोपी गणेश पवार याची किरकोळ कारणातून भांडणे झाली होती. त्याच्याच रागातून सायंकाळी सहाच्या सुमारास पवार याने शेख याच्यावर त्याच्याकडील बंदूकीतून दोन ते तीन गोळ्या फायर केल्या. तसेच त्याचे साथीदार विशाल सोमवंशी, विनोद सोमवंशी, कृष्णा लोखंडे यांच्यासह इतरांनी फिर्यादीच्या दिशेने दगडफेक करून त्यांचे मित्र अमीर शेख, अली खान, नौशल शेख , समील शेख यांना लाथाबुक्यांने मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Shooting at a young man out of prejudice