दत्तनगर चौकात गोळीबार, व्यापारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST2021-02-15T04:12:23+5:302021-02-15T04:12:23+5:30
धनकवडी : दत्तनगर चौकामध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.१४) रात्री दहा वाजता घडली. विशाल पंजाबी (वय ...

दत्तनगर चौकात गोळीबार, व्यापारी जखमी
धनकवडी : दत्तनगर चौकामध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.१४) रात्री दहा वाजता घडली. विशाल पंजाबी (वय ३२) यांच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. बालाजी ट्रेनिंग कंपनी या नावाने असलेल्या किराणा दुकानात तिघे भाऊ काम करत. यामधील दोन नंबरचा भाऊ विशाल दुकानात असताना दोन अज्ञात व्यक्तीपैकी एकाने पिस्तूल बाहेर काढले. यावेळी विशाल हे चोर चोर असे ओरडू लागल्याने दुकानातील दोन कामगार बाहेर आले. यामधील प्रजापती हातगाडी घेऊन आले. दरम्यान अज्ञात व्यक्तीपैकी एकाने गोळीबार केला आणि गाडी घेऊन पसार झाले.