धक्कादायक....पुण्यात जवानांचा मूकबधीर महिलेवर वर्षभर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:33 IST2018-10-18T05:32:53+5:302018-10-18T05:33:10+5:30
पुणे : खडकीच्या लष्करी रुग्णालयात सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या महिलेच्या मूकबधीरतेचा गैरफायदा घेत ४ जवानांनी तिच्यावर बलात्कार ...

धक्कादायक....पुण्यात जवानांचा मूकबधीर महिलेवर वर्षभर बलात्कार
पुणे : खडकीच्या लष्करी रुग्णालयात सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या महिलेच्या मूकबधीरतेचा गैरफायदा घेत ४ जवानांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
महिलेने इंदूरमधील स्वयंसेवी संस्थेकडे धाव घेतल्यामुळे ४ वर्षांनी हा प्रकार उघडकीस आला. रवींद्र सिंह, मोहम्मद मुथाझिम, हारुन रशिद, अहिरवाल या जवानाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लष्कराने चौकशी समिती नेमली असून, रुग्णालयाच्या महिला अधिकाºयाचा यात समावेश आहे.
ही पीडित महिला विधवा असून तिला १२ वर्षाचा मुलगा आहे़ ती जुलै २०१४ मध्ये रात्रपाळीस असताना चौघांपैकी एकाने तिच्यावर वॉर्डमधील स्वच्छतागृहात बलात्कार केला. पीडितेने त्याची वरिष्ठ जवानाकडे तक्रार करताच त्यानेही बलात्कार केला. दोघांनी तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही दिली. जानेवारी ते जून २०१५ व त्यानंतर वेळोवेळी संबंधित दोघांव्यतिरिक्त आणखी दोन जवानांनी तिच्यावर बलात्कार केला.