शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...त्या रुग्णाचा मृत्य कोरोनामुळेच! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 15:07 IST

कोरोनाबाधित महिला रूग्णावर उपचार सुरू असतानाच म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देमहिनाभरात बारामतीत म्युकरमायकोसिसच्या १९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत

बारामतीबारामती येथील एका कोरोनाबाधित महिला रूग्णावर उपचार सुरू असतानाच म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव आढळून आला. दरम्यान या रूग्णावर म्युकरमायकोसिस आजारावर देखील आरोग्य प्रशासनाने कुटूंबियांच्या समंतीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. उपचारा दरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला. मात्र या रूग्णाचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव बारामती परिसरात दिसून येऊ लागला आहे.  आतापर्यंत बारामतीमध्ये आजूबाजूच्या तालुक्या व जिल्ह्यांसहित म्युकर मायकोसिसच्या ३६ रूग्णांची उपचार घेतले आहे. त्यामध्ये ७ रूग्ण पुण्याला अन्य रूग्णांना बारामतीमध्ये उपचारानंतर घरी सोडण्यात आले. महिनाभरात बारामतीत म्युकरमायकोसिसच्या १९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यापैैकी पुण्यात उपचारा घेत असलेले बारामतीतील दोन रूग्ण दगावले आहेत.

सबंधीत महिलेवर तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.  मात्र कोरोनोमुळे या रूग्णांची ऑक्सिजन पातळी ८० च्या खाली होती. बेशुद्ध अवस्थेतच कुटूंबियांच्या संमतीने म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतरच्या उपचारास प्रतिसाद न दिल्याने या महिला रूग्णाचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले. बारामती कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग आढळून येऊ लागला आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे अढळून आल्यास तातडीने रूग्णांनी तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे केले आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूdocterडॉक्टर