शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

कात्रज स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार: कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून लुटले जातात ८ ते १० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:44 IST

नातेवाईकांना लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केले जात आहे प्रवृत्त

ठळक मुद्देस्मशानभूमीच्या जागेतच गोवऱ्या, लाकडे अशा साहित्यांची विक्री

कात्रज : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असाताना मृतांची संख्याही शहरात वाढत आहे. अशा परिस्थितीत कात्रज स्माशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे. कात्रज स्माशानभूमीत मृतांच्या भावनिकतेशी खेळ केला जात असून अंत्यविधीच्या सामानाचे अवाजवी दर आकारले जात आहेत. 

कात्रज स्माशानभूमीत विद्यूतदाहिनी असताना कोरोनाच्या मृतांचे अंत्यसंस्कार करताना विद्यूतदाहिनीला प्राधान्य दिले जात नाही.  मृतदेहांचे मोठ्या प्रमाणावर लाकडांवर आणि पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी केले जात आहेत. शास्त्रात चालत नाही. विद्युत वाहिनीवर अंत्यविधी केल्यास मोक्ष, शांती मिळणार नाही. अशा गोष्टी सांगून भूलथापा दिल्या जात आहेत. बऱ्याचवेळा विद्युतदाहिनेकडे जाणाऱ्या मृतदेहांना लाकडांवर अंत्यविधी करण्यासाठी परावृत्त केले जाते. एकूण मृतांच्या नातेवाईकांची लयलूट चालू असल्याचे दिसून आहे. 

एका दिवसात विद्यूतदाहिनीवर साधारणतः १५ पर्यंत मृतदेह जाळले जावू शकतात. पण लाकूडवाल्यांच्या सांगितल्याने विद्युतदाहिनीकडे मृतदेह जात नाहीत. त्याठिकाणी नातेवाईकांची दिशाभूल केली जात आहे. साधारणतः दिवसाला येणाऱ्या १० ते १२ मृतदेहांपैकी ६ ते ७ विद्युत दाहिनीवर तर ४ ते ५ जाणीवपूर्वक लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केला जात आहे. त्यामुळे  नागरिकांना ८ ते १० हजारांचा भुर्दंड पडत आहे. स्मशानभूमीच्या जागेतच अंत्यविधीचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी जागा केली आहे. नातेवाईकांसाठी बसायला असणाऱ्या जागेत बांबू, गौऱ्या, लाकडे इत्यादी साहित्य ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.  यामुळे स्मशानभूमीतील जागा मोठ्या प्रमाणावर काबीज केल्याचे दिसून येते. 

राजकीय हस्तक्षेप असल्याने कारवाई होत नाही - मंगलदास माने, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, महापालिका

स्माशानभूमीत मागील १० ते १५ वर्षापासून हे सुरु आहे. आम्ही अनेकवेळा कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजकीय हस्तक्षेप आडवा येतो. अशावेळी आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. -

विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार मोफत होत असताना एका अंत्यविधीसाठी ८ ते १० हजार रुपये घेणे ही मोठी लूट आहे.  कोरोनाचा मृतदेह प्राधान्याने विद्युतदाहिनीवर घ्यायला हवा, मात्र तसे होताना दिसत नाही. प्रशासनाने हे थांबवायला हवे. -                                                                         

                                                                                                  महेश कदम, अध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका