शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चोरून चित्रिकरण करत गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ केला व्हायरल, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 15:40 IST

Gautami Patil Video: गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गौतमी पाटीलचे कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना चित्रिकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोनिका धुमाळ यांनी ही तक्रार दिली आहे. 

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, कपडे बदलताना हा व्हिडीओ चोरून चित्रित करण्यात आला. तसेच नंतर गौतमी पाटीलला बदनाम करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन इन्स्टाग्राम अकाऊंट असलेल्या एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीने गौतमी पाटील ही कपडे बदलत असताना तिचे व्हिडीओ चित्रित करून काढलेला व्हिडीओ इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून तसेच फिर्यादी व इतर सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील काहीजण गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे म्हणत आहेत.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील डान्सशिवाय लावणी आणि अश्र्लिलतेच्या कारणावरून कायम वादात असते. खूप कमी कालावधीत गौतमी पाटीलनं सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते गर्दी करतात. चुकीचे हावभाव आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे ती नेहमीच ट्रोल होते. गौतमीच्या डान्सशिवाय तिचे काही बोल्ड फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतमी ही मुळची शिंदखेडा, धुळे येथील असून डिजे शोव्ह मध्ये डान्सर म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे खेड्यात असो किंवा मोठ्या शहारात तिला आवर्जून बोलावले जाते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे