शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अंतिम वर्षाच्या मराठी विषयाचा प्रश्नसंच सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 20:47 IST

परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंच देणाऱ्या संबंधित प्राध्यापकांवर विद्यापीठातर्फे कारवाई केली जाणार आहे..

ठळक मुद्देपरीक्षेचे काम वाढले ; संबंधित प्राध्यापकांवर कारवाई

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मराठी विषयाच्या परीक्षेचा बहुपर्यायी प्रश्नांचा प्रश्नसंच परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मराठी विषयाच्या परीक्षेचे काम वाढले असून परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देणाऱ्या संबंधित प्राध्यापकांवर विद्यापीठातर्फे कारवाई केली जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाहीत ;याची खबरदारी घेण्यात येणार आहे.        विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न तयार करण्याची जबाबदारी काही प्राध्यापकांना देण्यात आली. त्यात पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयातील आणि बारामती परिसरातील महाविद्यालयातील दोन महिला प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार केलेले प्रश्न विद्यार्थ्यांना पाठविले. परीक्षेपूर्वीच प्रश्न विद्यार्थ्यांना  मिळाल्याने एकाच गोंधळ उडाला. परिणामी विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांना दिले. त्यावर संबंधित प्रश्न वगळून इतर नवीन प्रश्न काढण्याचे काम अभ्यास मंडळाने सुरू केले आहे. त्यामुळे मराठी विषयाच्या परीक्षेचे काम वाढले आहे.मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य संदीप सांगळे म्हणाले, बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेण्याची विद्यापीठाची प्रश्न काढण्याची प्राध्यापकांची ही पहिलीच वेळ आहे. परीक्षेचे कामकाज गोपनीय पद्धतीने करणे गरजेचे आहे.मात्र,काही प्राध्यापकांकडून अनावधानाने प्रश्न बाहेर गेले आहेत.-------------मराठी विषयाचे प्रश्न सोशल मीडियावर फिरत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. तसेच इतर बहुपर्यायी प्रश्न काढून विद्यापीठाकडे जमा करण्याबाबत त्यांना कळविले आहे.- डॉ. महेश काकडे, संचालक , परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------------------सोशल मीडियावर फिरत असलेले प्रश्न वगळून इतर प्रश्न काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परीक्षेत व्हायरल झालेले प्रश्न येणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. - डॉ. शिरीष लांडगे अध्यक्ष ,मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाmarathiमराठी