शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पुण्यातील धक्कादायक घटना! घरगुती त्रासातून जावयाने सासूचा गळा दाबून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 20:27 IST

जावई बिबवेवाडी पोलिसांच्या अटकेत

ठळक मुद्देपत्नीला सोडून राहत होता सासूबरोबर

पुणे: पत्नीला गावी सोडून सासुबरोबर एकत्र राहणार्‍या जावयाने दररोजच्या घरगुती भांडणाला कंटाळून रागाच्या भरात हाताने मारहाण करुन ओढणीने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना बिबवेवाडीतील शेळके वस्ती येथे शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. पोलिसांनी असिफ दस्तगीर आत्तार (वय २६, रा. शेळकेवस्ती, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. अनारकली महमद तेरणे (वय ४५) खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याप्रकरणी मौलाली मंजलापूरे (वय ३१, रा़  मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे.

असिफ हा मंजलापूरे यांच्या पत्नीच्या मामाचा मुलगा आहे. तो मुळचा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील राहणारा आहे.  तो ८ ते ९ महिन्यांपूर्वी मंजलापूरे यांच्याकडे आला. त्याने आपले व पत्नीची भांडणे झाली असून मी तिला सोडून दिले आहे. अनारकली ही माझी सासू आहे.  मी तिला पळवून आणले असून ती माझी बायको आहे. तिची मुलगी सोनियाही आमच्याबरोबर असल्याचे त्याने मंजलापूरे यांना सांगितले. त्यानंतर मांजलापुरे यांनी ओळखीतून बिबवेवाडी येथील शेळके वस्तीत त्याला भाड्याने खोली घेऊन दिली होती. अनारकली ही नीट जेवण करत नाही. सतत पेसे मागत असते. यावरुन त्यांच्यात रोज भांडणे होत. 

३० एप्रिलला त्यांच्यात भांडण झाल्यावर सासूला मारहाण करून असिफ घराबाहेर निघून गेला. रात्रभर रस्त्यावर फिरला. १ मेला सकाळी ९ वाजता तो घरी परतल्यावर त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. तेव्हा त्याने रागाच्या भरात ओढणीने तिचा गळा आवळला. ती निपचित पडली. तेव्हा घाबरुन असिफ याने ही गोष्ट मंजलापूरे यांना सांगितली. त्यांनी तातडीने बिबवेवाडी पोलिसांना जाऊन ही हकीकत सांगितली. पोलिसांनी घर जाऊन पाहिले असता अनारकली हिचा मृत्यु झाला होता. पळून गेलेल्या असिफ आत्तार याचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक