शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील धक्कादायक प्रकार! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणाऱ्या होमगार्डला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:11 IST

(Cyber Crime) छायाचित्रे तिच्या मोबाईल क्रमांकावर पाठवून त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले

बारामती : छायाचित्रात छेडछाड करीत मित्राच्या पत्नीची (Friend Wife) अश्लील इमेज तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीसांनी हायटेक तपास करीत या प्रकरणी होमगार्डला (Homeguard) अटक केली आहे.

याबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार अभिजित विजय हटकर (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) असे या होमगार्डचे नाव आहे. संबंधित महिलेने यासंबंधी फिर्याद दाखल केली आहे. 

महिला हटकर याच्या मित्राची पत्नी आहे. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे - जाणे होते. त्यातून त्याचा आणि मित्राच्या पत्नीचा संवाद झाला होता. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळविला. या मोबाईल क्रमांकावर सोशल मिडीयाच्या मदतीने अश्लील शेरेबाजी केली. तसेच या महिलेच्या छायाचित्रात छेडछाड करत अश्लिल इमेज तयार केली. त्यानंतर ही छायाचित्रे त्याने तिच्या मोबाईल क्रमांकावर पाठवली. त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल,असे ‘मेसेज’पाठविले. त्यामुळे या महिलेने तात्काळ शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ सुत्र हलवत तपास सुरु केला. त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीने स्वत:चा मोबाईल क्रमांक बंद ठेवून देखील सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा पोलीसांनी शोध घेत त्याला अटक केली.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोपाळ ओमासे, पोलिस नाईक किरण कदम, अतुल जाधव यांनी सायबर सेलची मदत घेत महत्वाची भुमिका बजावली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. तो सायबर फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकcyber crimeसायबर क्राइम