शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! प्रेयसीचे अश्लील चित्रीकरण वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:41 IST

प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती.

ठळक मुद्देलोणी काळभोर येथील घटना : व्हिडिओ कॉल द्वारे करण्यात आले चित्रीकरण सदर कॉल मार्च ते एप्रिल २०१८ या कालावधीत

लोणी काळभोर : कॉलेजमधील विद्यार्थी प्रेयसीला व्हिडीओ कॉल करत तिला कपडे काढण्यास सांगून त्याचे अश्लील चित्रीकरण करून ते वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध २० वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लोणी काळभ़ोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक राजेंद्र जाजू (रा. लासूर, जि. औरंगाबाद) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी सध्या लोणी काळभोर येथील एका युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तिची प्रतीकसोबत शाळेत इयत्ता ९वी ते १२वीपर्यंत मैत्री होती. त्यानंतर तो औरंगाबाद येथे गेला होता. नोव्हेंबर २०१७मध्ये त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती त्याला भेटायला दोन ते तीन वेळा औरंगाबाद येथे गेली होती. दोघांमध्ये मोबाईलवरून व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे होत असे, तेव्हा तो तिला अंगावरील कपडे काढण्यास सांगत असे. त्याप्रमाणे ती करत होती. सदर कॉल मार्च ते एप्रिल २०१८ या कालावधीत झाले होते. त्यानंतरही त्यांचे मोबाईल चॅटिंग सुरू होते.  १५ जुलै रोजी तरुणी लोणी काळभोर येथील एका महाविद्यालयात शिक्षणासाठी आली होती. ती आपल्या लोणी काळभोर गावात भाडेतत्त्वावर घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत असताना त्यावेळी रात्री सव्वादहाच्या सुमारास तिला मोबाईलवर प्रतीककडून व्हॉट्सअ‍ॅपवरून एक व्हिडीओ आला.तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. यापूर्वी त्याने व्हिडीओ कॉल करून तिला कपडे काढण्यास सांगत त्याचे चित्रीकरण केले होते. त्यानंतरही प्रतीकने तिला मेसेज करून व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तो तिला रोज छळत असल्याने तिने ही बाब तिच्या भावाला सांगितली. याबाबत चर्चा करून तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ७ आॅगस्ट रोजी प्रतीक राजेंद्र जाजू (रा. लासूर, ता. जि. औरंगाबाद) याच्याविरोधात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ