शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जन्मदाखला दिला मुलाचा,आईवडिलांकडे सोपविली मुलगी; पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:45 IST

बाळ बदलल्याचा प्रशासनावर आरोप

ठळक मुद्देडीएनए तपासणीची रुग्णालय प्रशासनाकडून प्रक्रिया 

पिंपरी : जन्मदाखला मुलाचा दिल्यानंतर एका खासगी रुग्णालयाने प्रत्यक्षात मात्र आईवडिलांकडे मुलगी सोपविली. आमचे बाळ बदलले आहे, असे आरोप बाळाच्या आईवडिलांनी केले. मात्र हे सर्व आरोपी रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. बाळासह आईवडिलांचे डीएनए तपासण्यात येईल, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिता अनिल जगधने (रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड) यांना प्रसुतीसाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि. १२) त्यांची प्रसुती झाली. त्यावेळी रिता यांच्या आई हिराबाई नवपुते रुग्णालयात उपस्थित होत्या. तुमची मुलगी रिता यांना मुलगा झाल्याचे संबंधित परिचारिकेने हिराबाई यांना सांगितले. जन्मत: बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे कारण सांगून बाळाला अतिदक्षता विभागात उपचार करण्याचे कारण सांगून काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या जन्म नोंदणीच्या दाखल्यावर संबंधित बाळाची मुलगा अशी नोंद करण्यात आली. दरम्यान रुग्णालयातील परिचारिका बाळाच्या आईकडून दूध घेऊन काचेच्या पेटीत ठेवलेल्या बाळाला पाजायच्या. तीन दिवसांत तब्येतीत सुधारणा झाल्याने बाळाला आईकडे दिले. त्यामुळे जगधने दाम्पत्य व नातेवाईक आनंदात होते. बाळाने शी केली आहे का, अशी शंका आल्याने त्यांनी बाळाला बघितले. आपल्या हातातील बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रिता यांच्या आई हिराबाई यांनी तातडीने रुग्णालयाला याचा जाब विचारला. 

अनिल जगधने याबाबत म्हणाले, ‘‘रुग्णालयातील प्रत्येक कागदावर मुलगी असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच डीएन तपासणीनंतर वास्तव समोर येईल, असे रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी आईवडील म्हणून आमचे तसेच बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.’’

................

बाळ बदलले नसून तसा काही प्रकार नाही. बाळाच्या नातेवाईकांचा काही गैरसमज झाला आहे. याप्रकरणी बाळासह त्याच्या आईवडिलांचा डीएनए तपासणीची प्रक्रिया करण्याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. प्रसुतीनंतर बाळाच्या नातेवाईकांनी अर्ज भरून द्यायचा असतो. या अर्जावरून महापालिकेकडून जन्मदाखला तयार केला जातो. - बरकत मुजावर, संचालक, सतर्कता व सुरक्षा विभाग, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरpregnant womanगर्भवती महिला