शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा जोरदार प्रतिकार; नाहीतर सावत्र पित्याच्या वासनेची झाली असती शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 21:18 IST

याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षाच्या पित्याला अटक केली.

पुणे : घरात रात्री झोपलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचा सावत्र पिता अत्याचाराचा प्रयत्न करु लागला़ तेव्हा या मुलीने तोंड दाबलेले असतानाही मोठ्या धाडसाने आपल्याच सावत्र पित्याला लाथ मारुन बाजूला केले. त्यामुळे तो खोलीतून पळून गेला. कोंढवापोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता घडली होती. तिने नंतर हा प्रकार आईला सांगितला़त्यानंतर सोमवारी या मुलीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा अल्पवयीन मुलीचा सावत्र पिता आहे. तो टिंबर मार्केटमध्ये कामाला असून मार्केटयार्ड परिसरात राहतो. तो अधून मधून एनआयबीएम येथील या मुलीच्या घरी येत असतो. तो १६ सप्टेंबर रोजी पिडित मुलीच्या घरी आला होता. ही मुलगी घरामध्ये झोपली असताना मध्यरात्रीच्या सुमारास सावत्र पित्याने तिचा विनयभंग केला. त्यावेळी या मुलीला जाग आली. हे पाहून त्याने तिचे तोंड दाबून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करु लागला. सावत्र पिताच असे करत असल्याचे पाहून तिने प्रसंगावधान राखून तिच्या अंगावर येणाऱ्या पित्याला लाथ मारुन बाजूला केले. ती प्रतिकार करीत असल्याचे दिसल्यावर सावत्र पिता पळून गेला.सावत्र पित्याने अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षाच्या पित्याला अटक केली आहे. १७ वर्षाच्या मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानाने ती अत्याचारापासून स्वत:चा बचाव करु शकली. या प्रकाराने ही मुलगी खूप घाबरली होती. हा सर्व प्रकार तिने सोमवारी आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सावत्र पित्याला अटक केली असून महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Kondhvaकोंढवाsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक