शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जिल्हा न्यायालयाच्या आवारात मानवी कवटी जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 20:35 IST

मुद्देमाल उघड्यावर केला जात होता नष्ट

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघड झाला आहे. नवीन इमारतीच्या मागील बाजूला सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मानवी कवटी व दात जाळण्यात येत होत्या.काही वकिलांनी आक्षेप घेतल्यानंतर हा मुद्देमाल न्यायालय प्रशासनाने पुन्हा ताब्यात घेतला. याबाबत अ‍ॅड. योगेन काकडे यांनी सांगितले की, आपल्या अशिलाच्या काही प्रकरणाची आज सुनावणी होती. त्यासाठी आपण न्यायालयात आलो होतो. न्यायालयातील कामकाज पूर्ण करुन आपल्याला दुसरीकडे जायचे असल्याने गाडी काढण्यासाठी नवीन इमारतीच्या मागील बाजूला ते गेले होते. त्यावेळी तेथे काही तरी जाळले जात असल्याचे दिसले. त्यामुळे उत्सुकता म्हणून पहायला गेलो तर, तेथे मानवी कवटी, दात जाळले जात होते. न्यायालयीन प्रक्रियेनुसार मुद्देमाल नष्ट करण्यात येतो. मात्र, त्यात मानवी कवटी, दात असतील तर ते उघड्यावर आणि न्यायालयाच्या आवारात नष्ट केले जात नाहीत. मानवी कवटी नष्ट करायची असेल तर ती जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने नष्ट केले जाते. अ‍ॅड. काकडे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर न्यायालय प्रशासनाने संबंधित मुद्देमाल पुन्हा ताब्यात घेतला.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय