शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पुण्यात १४ वर्षाच्या चिमुरड्याचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 10:25 IST

मैदानात क्रिकेट खेळत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला आणि...

Shocking in Pune, Child Heart Attack: एका १४ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पुण्यात ही घटना घडली. हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. मित्रांनी लगेचच त्याच्या वडिलांना याची माहिती दिली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले, परंतु त्या मुलाचा मृत्यू झाला. एवढ्या चिमुकल्याला हृदयविकाराच्या झटक्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वनोरी परिसरात गुरुवारी सायंकाळी 14 वर्षीय विद्यार्थी वेदांत त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळत असतानाच या मुलाला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे जमिनीवर पडल्यानंतर मुलाला त्रास होऊ लागला. एकत्र खेळणाऱ्या मुलांनी लगेच वेदांतच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर मुलाला वानोरी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मुलाची प्रकृती पाहता प्राथमिक उपचारानंतर त्याला मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीयांनी मुलाला फातिमा नगर येथील खासगी रुग्णालयात नेले. मुलाची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले, मात्र उपचार सुरू केले असता मुलाचा मृत्यू झाला. कार्डिएक अरेस्टमुळे मुलाची प्रकृती बिघडली होती आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईक आणि डॉक्टरांची चौकशी केली. वानौरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले की, मुलाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत एवढ्या लहान मुलासोबत अशी परिस्थिती का आणि कशी घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासाठी मुलासोबत खेळणाऱ्या इतर मुलांचीही चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेHeart Attackहृदयविकाराचा झटकाkidsलहान मुलं