शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

धक्कादायक ! रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराने विकणार्‍या परिचारिकेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 20:19 IST

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड सेंटरमध्ये काम करणारी परिचारिकाच पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे....

पुणे : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या  फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड सेंटरमध्ये काम करणारी परिचारिकाच पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. रुग्णाला पहिल्या दिवशी दिल्या जाणार्‍या दोन इंजेक्शनपैकी ही परिचारिका फक्त एकच इंजेक्शन देत आणि दुसरे इंजेक्शन काळाबाजारात विकत असल्याचे आढळून आले आहे. 

रिबिका विनोद वैरागर (वय ३५, रा. मासाळ चाळ, पिसोळी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून ४ व अंकित सोलंकी याच्याकडून ३ अशी ७  रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. रिबिका ही हडपसर येथील एका खासगी कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम करीत आहे. 

अंकित विनोद सोलंकी (वय २६, रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, दापोडी) या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी अगोदर अटक केली होती. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना अंकीत सोलंकी हा कोंढव्यातील जायका हॉटेलजवळ रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सय्यद यांनी साध्या वेशामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांच्या पथकाला बनावट ग्राहक तयार करुन इंजेक्शन घेण्यास पाठविले. यावेळी सोलंकी याने अंमलदाराला जायका हॉटेलच्या बाजूला नेऊन त्यांना दोन इंजेक्शन दाखविले. एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपये रोख स्वीकारले. नंतर १० हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात मागणी करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून या फार्मासिस्टला पकडले होते. 

अंकित सोलंकी याने अगोदर पोलिसांची सातत्याने दिशाभूल केली. इंजेक्शन कोठून मिळविली, याची त्याने वेगवेगळी कारणे सांगितले. ती सर्व खोटी निघाली. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी आपल्यापद्धतीने चौकशी केल्यावर त्याने खरा प्रकार सांगितला. त्याला पकडले, त्याच्या अगोदर त्याचा एका महिलेला फोन झाला होता. त्याबाबत चौकशी केल्यावर या महिलेने इंजेक्शन आणून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अंकितला पुन्हा या महिलेला फोन करायला सांगितले. त्यानुसार त्याने फोन केल्यावर ती ४ इंजेक्शन घेऊन आली. पोलिसांनी तिला पकडले. तिच्याकडे चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. 

अशी करत होती इंजेक्शनची चोरी रिबिका ही हडपसर येथील एका कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कामाला आहे. कोविड रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनचा ६ इंजेक्शनचा कोर्स असतो. त्यापैकी २ इंजेक्शन्स पहिल्या दिवशी दिली जातात व नंतर दररोज एक अशी पुढील चार दिवस  इंजेक्शन दिले जाते. हे काम परिचारिकाच करतात. रुग्णाला पहिल्या दिवशी इंजेक्शन देताना रिबिका दोन ऐवजी फक्त एकच इंजेक्शन देत असे. दुसरे इंजेक्शन ती चोरत असे. त्यानंतर ती ते बाहेर काळाबाजारात विकत असे. 

अंकित याला पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्याच्याकडे २ इंजेक्शन होती. आणखी एक इंजेक्शन त्याच्या गाडीच्या डिकीत पोलिसांना मिळाले. याशिवाय वापरलेल्या इंजेक्शनच्या ५ बाटल्या डिकीत आढळून आल्या. तसेच रिबिकाकडील ४ इंजेक्शन अशी ७ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. तिने आणखी कोणा कोणाला ही इंजेक्शन दिली याचा तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसmedicineऔषधंfraudधोकेबाजीArrestअटकWomenमहिलाPoliceपोलिस