शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अबब.... ! महापालिका भाड्याच्या वाहनांवर करणार दोन वर्षांत तब्बल ४५ कोटींचा खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 13:26 IST

शासनाच्या या अध्यादेशाचा संदर्भ घेत महापालिकेच्या वतीने यापुढे छोट्या गाड्या खरेदी न करता बांधा व वापरा(बीओटी)वर भाडेतत्त्वार घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीमहापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडे एकूण ११८७ विविध प्रकारची वाहने कार्यरत घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, अग्निशमन याविभागांसाठी वाहने भाड्याने स्वयंभु ट्रान्सपोर्ट यांना प्रतिवर्षी २२ कोटी ५० लाख रुपये देण्यास मान्यता

पुणे:  महापालिकेकडे पुरेसे वाहनचालक नसल्याने ज्या सेवा आऊट सोर्सिंगद्वारे करणे शक्य आहे. त्यासेवा आऊट सोर्सिगकरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शासनाच्या या अध्यादेशाचा संदर्भ घेत महापालिकेच्या वतीने यापुढे छोट्या गाड्या खरेदी न करता बांधा व वापरा(बीओटी)वर भाडेतत्त्वार घेण्यात येणार आहे. यासाठी स्वयंभु ट्रान्सपोर्ट यांना प्रतिवर्षी २२ कोटी ५० लाख रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. त्यांना हे काम दोन वर्षासाठी दिले आहे. यामुळे भाड्याने वाहने घेण्यासाठी दोन वर्षांत तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.      महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडे एकूण ११८७ विविध प्रकारची वाहने कार्यरत आहेत. ही वाहने घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, विद्युत, अग्निशमन दल, पथ विभाग, मलनि:सारण विभाग, स्थानिक संस्था कर, अतिक्रमण/अनाधीकृत बांधकाम निर्मुलन विभागसामान्य प्रशासन विभाग परिमंडल विभाग इत्यादी अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, अग्निशमन विभाग याविभागामध्ये कार्यरत असणारी वाहने ही ३६५ दिवस २४ तास कार्यरत ठेवावी लागतात. सध्या महापालिकेकडे अपुरे वाहनचालक सेवक असल्याने महापालिकेच्या ज्या सेवा आऊट सोर्सिगद्वारे करणे शक्य व आवश्यक आहे.  अशा सेवा आऊट-सोर्सिगद्वारे करण्यात याव्यात असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, अग्निशमन विभाग याविभागांसाठी पुढील दोन वर्षांसाठी वाहने भाड्याने घेण्याचे ठरविण्यात आले. यासाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, या खर्चाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGovernmentसरकार