शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाच्या २५ जणांना कोरोनाची लागण;१९ परिचारिका व सहा कर्मचाऱ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:22 IST

एकाच रुग्णालयातील एवढे कर्मचारी बाधित होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना

ठळक मुद्देबाधितांच्या संपर्कातील लक्षण असलेल्या व नसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटल मधील एक पूर्ण इमारत संभाव्य कोविड -१९ रुग्णांसाठी समर्पित

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील तब्बल २५ जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये १९ परिचारिका व अन्य सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच रुग्णालयातील एवढे कर्मचारी बाधित होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने संपुर्ण एक इमारत या रुग्णांसाठी केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांमुळे अन्य रुग्णांना संसर्ग झाला नसल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट यांनी दिली.रुबीमध्ये दि. १० एप्रिल रोजी पहिल्यांचा एका परिचारिकेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर दक्षता म्हणून प्रशासनाने २० हून अधिक परिचारिकांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये मागील १० दिवसांत २५ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. याविषयी भोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली परिचारिका रेड झोनमधील कासारवाडी येथील आहे. त्यानंतर जवळपास १ हजार कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण, तसेच कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी २५ जण पॉझिटिव्ह आडळून आले आहेत. त्यातील कोणालाही कोरोनासदृश लक्षण नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणालाही व्हेंटिलेटर ची गरज भासली नाही. या सर्वांचे विलगीकरण केले असून ही साखळी विस्तारण्यापासून रोखले आहे .बाधितांच्या संपर्कातील लक्षण असलेल्या व नसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. आमच्या समन्वित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे एकही रुग्ण या घटनेने संक्रमित झाला नाही. सध्या १९ परिचारिका, ३ सहाय्यक कर्मचारी आणि तीन क्लिनिकल सहायकांचे चे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हॉस्पिटल मधील एक पूर्ण इमारत संभाव्य कोविड -१९ रुग्णांसाठी समर्पित केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी नियमावलीचे पालन केले जात आहे, असे भोट यांनी स्पष्ट केले.---------------

--

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस