पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला आहे. येत्या शिवजयंतीच्या दिवशी (दि.१९) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी १७ ते १९ असे ३ दिवस शिवसृष्टी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार यांनी कळवली आहे. दररोज अनेक शाळा व नागरिक या शिवसृष्टीला भेट देत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसृष्टी तीन दिवस बंद राहणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पवार यांनी सांगितले.