शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पंतप्रधानांच्या भेटीसाठी शिवशाहीर दिल्लीत, लाल किल्ल्यावर ‘जाणता राजा’चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:59 AM

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या देदीप्यमान शौर्याचा अभिमान जागृत करणारे स्वराज्यनिर्मितीच्या धगधगत्या संघर्षाचे महानाट्य म्हणजे ‘जाणता राजा’. या महानाट्याचा प्रयोग येत्या ६ ते १० एप्रिलदरम्यान लाल किल्ल्यावर रंगणार आहे. या महानाट्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.

पुणे - छत्रपती शिवाजीमहाराजांच्या देदीप्यमान शौर्याचा अभिमान जागृत करणारे स्वराज्यनिर्मितीच्या धगधगत्या संघर्षाचे महानाट्य म्हणजे ‘जाणता राजा’. या महानाट्याचा प्रयोग येत्या ६ ते १० एप्रिलदरम्यान लाल किल्ल्यावर रंगणार आहे. या महानाट्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि शिवचरित्राचे प्रदर्शन दिल्लीमध्ये करण्यासंदर्भात आॅगस्ट २०१७मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.स्वत: मोदी यांनी ट्विटरवरून या भेटीची छायाचित्रे शेअर केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र आणि शिवाजीमहाराजांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. वयाच्या ९६व्या वर्षीही ते शिवचरित्राच्या प्रसारासाठी कार्य करीत आहेत. भेटीची छायाचित्रे शेअर करताना मोदी यांनी पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा केली होती. ‘मी अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. तसेच त्यांचा आदर करतो,’ असेही मोदींनी म्हटले होते. या भेटीदरम्यान पुरंदरे यांनी पंतप्रधान मोदी यांना मराठा सरदार वापरत तशी जरीची पगडी आणि उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला. बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजीमहाराजांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत, असे उद्गार मोदी यांनी काढले होते.दिल्ली येथे होणाºया या महानाट्य आणि शिवचरित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे, अशी बाबासाहेबांची इच्छा आहे. यंदाच्या वर्षी ९ ते १५ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीमध्ये हे महानाट्य आयोजित करण्यात आले होते. मात्र, लाल किल्ल्यावर हा नाट्यप्रयोग होणार असल्यामुळे परवानग्या मिळण्यास विलंब लागल्याने ते पुढे ढकलण्यात आले.येत्या ६ ते १० एप्रिलदरम्यान ‘जाणता राजा’चा प्रयोग लाल किल्ल्यावर होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे दिल्लीला गेले आहेत. मात्र, मोदी व्यस्त असल्याने त्यांची अद्याप मोदींशी भेट होऊ शकलेली नाही.जाणता राजा’ महानाट्याचे उद्घाटन करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यासाठी दिल्लीला आलो आहे. मात्र, मोदी नियोजित कार्यक्रमांमुळे खूप व्यस्त आहेत. त्यांच्या पीएकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे; मात्र अद्याप ती मिळालेली नाही. शुक्रवारी (दि. ९ मार्च) मोदी यांना कुठे आणि किती वाजता भेटायचे, हे कळणार आहे.- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेPuneपुणे