शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सासवड - जेजुरी महामार्गावर शिवरी येथे शिवशाही बस धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 19:09 IST

पुणे येथून बारामतीच्या दिशेने जात असताना हा बसला हा अपघात झाला..

ठळक मुद्देचालकासह दोन प्रवासी जखमी

जेजुरी :  सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर शिवरी (ता.पुरंदर) येथे बस चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात येणारी शिवशाही बस यमाई माता मंदिराला व बाजुच्या हॉटेलला जोरात धडकली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात बसच्या चालकासह दोन प्रवासी जखमी झाले.          पुणे येथून बारामतीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.यामध्ये चालक गणेश पांडुरंग भापकर (वय ३४ रा. लोणी भापकर,ता.बारामती)हा गंभीर जखमी झाला आहे. तर गोरख भगवान राऊत (वय ६८ रा.चिंचवड,पुणे), विक्रम लक्ष्मण घाडगे (वय ४४ ससाणेनगर,हडपसर पुणे) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.यांच्यावर सासवड येथील खाजगी रूग्नालयात उपचार सुरू आहेत.       याठिकाणी प्रत्यक्षदर्शी मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडुन डाव्या बाजूने येणारी बस पुर्णपणे रस्त्याच्या विरुद्ध उजव्या बाजुला येऊन यमाई माता मंदिर, बाजुच्या हॉटेलला जोरात धडकली व पुन्हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन थांबली.      याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत.पावसामुळे मोठा अनर्थ टाळला.या हॉटेलच्या बाहेर नियमितपणे वीस ते पंचवीस नागरिक  बसलेले असतात. मात्र, आज सकाळी सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हे सर्व नागरिक समोरील पालखी विसावा सभा मंडपात निवाऱ्यासाठी बसले होते. तर यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा या विचित्र अपघातामध्ये मोठी जीवितहानी झाली असती.यावर त्यांनी पोलिसांच्या पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. 

टॅग्स :JejuriजेजुरीAccidentअपघातShivshahiशिवशाही