शिवसेनेचे दहा उमेदवार जाहीर

By Admin | Updated: November 15, 2016 02:57 IST2016-11-15T02:57:26+5:302016-11-15T02:57:26+5:30

लोणावळा शहर शिवसेनेकडून नगर परिषद निवडणुकीतील दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान नगरसेवक सुनील इंगूळकर यांना पुन्हा

Shivsena's ten candidates declared | शिवसेनेचे दहा उमेदवार जाहीर

शिवसेनेचे दहा उमेदवार जाहीर

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेनेकडून नगर परिषद निवडणुकीतील दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान नगरसेवक सुनील इंगूळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५ महिलांचा समावेश आहे.
तालुकाप्रमुख राजू खांडभोर व लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांनी यादी जाहीर केली. उमेदवारांची दुसरी यादी व नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना मंगळवार, दि. १५ रोजी जाहीर करणार असल्याचे शहरप्रमुख शेट्टी यांनी सांगितले.
वलवण प्रभाग क्र. ३ मधील अनुसूचित जाती पुरुष जागेसाठी मधूकर गायकवाड, नांगरगाव प्रभाग क्र. ४ येथील सर्वसाधारण जागेसाठी सुनील इंगूळकर व सर्वसाधारण स्त्री जागेसाठी मंदा म्हाळसकर, लोणावळा नगर परिषद कार्यालय या प्रभाग क्र. ६मधील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी शिवसेना शहर महिलाध्यक्षा संगीता कंधारे, आगवाला चाळ या प्रभाग क्र. ७मध्ये सर्वसाधारण जागेसाठी शिवसेना माजी शहरप्रमुख शिवदास पिल्ले व अनुसूचित जाती स्त्री जागेसाठी करुणा चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. खंडाळा प्रभाग क्र. ९ येथील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी जयश्री खराडे, तर अनुसूचित जमाती जागेसाठी अशोक गवारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जुना खंडाळा प्रभाग क्र. १० येथील इतर मागास वर्ग जागेसाठी माजी नगरसेवक गणेश इरले यांना, तर भुशी रामनगर प्रभाग क्र. १२ येथील सर्वसाधारण जागेवर माणिक मराठे व अनुसूचित जाती स्त्री जागेवर अनिता चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.
केंद्रात व राज्यात भाजपा-शिवसेनची युती असली, तर लोणावळा काही जागावर एकमत न झाल्याने शिवसेना व भाजपा एकमेकांच्या समोर उमेदवार देऊन लढणार आहेत. भाजपानेदेखील त्यांची ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच शिवसेनेही ११ उमेदवारांची यादी जाहीर करुन जशास जसे उत्तर दिले आहे.

Web Title: Shivsena's ten candidates declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.