शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: '15 वर्षे खासदार, शिवसेनेसाठी जिल्ह्यात भांडलो; पण एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:09 IST

शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे

पुणे - शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली होती. त्यानंतर, पाटील यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, गेल्या 15 वर्षे मी खासदार राहिलो आणि केवळ एका फेसबुक पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं. 

शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी समाज माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, काही वेळेतच नजरचुकीने हा प्रकार झाल्याचे सांगून शिवसेनेने कारवाई मागे घेतली होती. तेव्हापासून आढळराव पाटील नाराज होते. ते शिवसेनेत थांबणार की शिंदे गटात जाणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी शिंदेगटात प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उद्या मंगळवार १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिवनेरी निवास, लांडेवाडी, तालुका-आंबेगाव येथे माझ्या व शिवसेना जिल्हाप्रमुख जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याचे मेसेजही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मनातील खदखद व्यक्त केली. एकनाथ शिंदेंना आमच्या अडचणी माहिती होत्या, निवडून येताना काय समस्या येतात याची जाणीव त्यांना आहे. मात्र, गेल्या 15 वर्षे या जिल्हयात मी खासदार होतो, मी शिवसेना जिल्ह्यातील गावाखेड्यात नेली वाढवली, येथील शिवसैनिकासाठी मी भांडतोय. पण, एका पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी केली, याची वेदना आढळराव पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच, दुसऱ्या दिवशी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यांनी तुम्ही परत या, असं सांगितल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMancharमंचर