शिवसेना पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड

By Admin | Updated: June 24, 2017 06:01 IST2017-06-24T06:01:54+5:302017-06-24T06:01:54+5:30

शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे यांच्या चिंचवड येथील कार्यालयाची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे

Shivsena office bearer's office collapsed | शिवसेना पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे यांच्या चिंचवड येथील कार्यालयाची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे. ही
घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी राजू गायकवाड (रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) त्याचा मित्र अन्सारी व इतर दोन साथीदारांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांचे चिंचवडमधील अजंठानगर येथील शिवनेरी हौसिंग सोसायटीत शिवसेनेचे कार्यालय आहे. गुरुवारी रात्री कार्यालयाच्या शेजारीच राहणारे भीमराव कोळी कार्यालयात बसलेले असताना राजू गायकवाड व त्याचे साथीदार कार्यालयात शिरले. कोळी यांना शिवीगाळ करीत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यासह कार्यालयातील टीव्ही, पंखा, घड्याळ याचेही नुकसान करुन कोकाटे यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, गायकवाड व कोकाटे हे दोघे भूम गावचे रहिवासी असून त्यांच्यात जमिनीचा वाद असल्याची माहिती पोलीस हवालदार अशोक खंडागळे यांनी दिली.

Web Title: Shivsena office bearer's office collapsed