शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Vikram Gokhale: '...तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते'; विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:16 IST

vikram gokhale: शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले.

पुणे-

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले. ते पुण्यात ब्राम्हण महासंघाद्वारे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विक्रम गोखले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राजकीय मुद्द्यांवर रोखठोक विधानं केली. ज्या मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा आणि शिवसेना दुरावले त्या प्रसंगाबाबत विक्रम गोखले यांनी एक गौप्यस्फोटच यावेळी केला. 

"शिवसेना-भाजपा एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. युती झाली त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना थेट विचारणा केली होती. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी दिलं असतं तर काय बिघडलं असतं? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची? असंही मी त्यांना म्हटलं होतं", असं विक्रम गोखले म्हणाले. त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय होती? असं विक्रम गोखले यांना विचारण्यात आलं असता फडणवीसांनी झाली चूक असं म्हटलं होतं, असा दावा गोखले यांनी केला. 

एकट्या फडणवीसांची चूक नाही"फडणवीसांनी तेव्हा झाली चूक असं मला म्हटलं होतं. पण खरंतर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना तुम्ही फसवू शकत नाही. कारण मग लोक कधीतरी त्याची प्रचंड शिक्षा तुम्हाला करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि  म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश वगैरे झुगारुन देतो", असं गोखले म्हणाले. 

भाजपा-शिवसेनेनं एकत्र यायला हवं"शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे", असंही विक्रम गोखले म्हणाले आहेत. 

"चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना