शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाचा विषय द्या- विनायक मेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:00 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण (maratha reservation) नाकारताना काही सूचना केल्या होत्या. राज्य मागासवर्ग आयोगाच्या ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण (maratha reservation) नाकारताना काही सूचना केल्या होत्या. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के किंवा ५० लाख जणांचे सर्वेक्षण करून त्याद्वारे केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी करणे शक्य आहे, पण विद्यमान आघाडी सरकार त्या दिशेने कोणतीही पावले उचलताना दिसत नाही. सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम आघाडी सरकार करत आहे, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे (vinayak mete) यांनी केला.

मराठा आरक्षण, राज्य मागासवर्गीय आयोगाची भूमिका तसेच ओबीसी आरक्षण व सध्य राजकारण या विषयांवर पुण्यात पत्रकार परिषदेत विनायक मेटे बोलत होते. सरकार आयोगाला सूचना करत नसल्याने शिवसंग्रामच्या व मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांना निवेदन दिले आहे. यावेळी प्रवक्ते तुषार काकडे, शेखर पवार, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, पुणे महिलाध्यक्षा कलिंदी गोडांबे, संजय शिंदे, कल्याणराव अडगळे, विनोद शिंदे, बाळासाहेब चव्हाण, सचिन दरेकर, समीर निकम, सुजाता ढमाले, अजिंक्य राजपुरे, लहू ओहोळ उपस्थित होते.

विनायक मेटे म्हणाले, सध्या असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या तिढ्यात सर्वस्वी राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. केंद्र सरकारचा काडीचाही संबंध नाही. विद्यमान राज्य मागासवर्ग आयोग असताना वेगळ्या आयोगाची घोषणा करणे हेसुद्धा घटनाबाह्य आहे. १२७व्या घटनादुरुस्तीप्रमाणे राज्य सरकारला राज्यातील मागास समाजाला योग्य प्रमाणात आरक्षण देण्याचे अधिकार आहेत. या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यातील मागासवर्ग आयोगाची भूमिका फार महत्त्वाची आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVinayak Meteविनायक मेटेMaratha Reservationमराठा आरक्षण