मुळशी तालुक्यातील तरुणांकडून शिवनेरीुव स्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST2020-12-11T04:29:23+5:302020-12-11T04:29:23+5:30

मुळशी तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर स्वच्छता अभियान ...

Shivneriuv cleaning campaign by the youth of Mulshi taluka | मुळशी तालुक्यातील तरुणांकडून शिवनेरीुव स्वच्छता मोहिम

मुळशी तालुक्यातील तरुणांकडून शिवनेरीुव स्वच्छता मोहिम

मुळशी तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर स्वच्छता अभियान आणि किल्ला संवर्धन मोहीम राबवण्यात येत असते. याच अनुषंगाने याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले शिवनेरी किल्ल्यावर या युवकांच्या वतीने स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियाना बरोबरच किल्ल्यावरती पर्यटकांना साठी आलेल्या नागरिकांना स्वच्छता अभियान आणि किल्ला संवर्धन याबद्दल योग्य ती माहिती ही देण्यात आली. मुळशी तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान नेहमीच लोकांना इतिहासाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व माहिती मिळावी म्हणून विविध मोहीम राबवत असते.

या मोहिमेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा चे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केले होते तसेच त्यांच्या बरोबर महेंद्र फाले, सागर सोनवणे, शिवशंकर वंजारी, संजय रेनुसे, विकास गायकवाड, ओम कोंढाळकर, वेद मारणे, विराज कोंढाळकर व इतर सहकारी उपस्थित होते.

--

Web Title: Shivneriuv cleaning campaign by the youth of Mulshi taluka