रणधीर जेधे यांना शिवछञपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:15 IST2021-02-17T04:15:03+5:302021-02-17T04:15:03+5:30

शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार कान्होजी नाईक जेधे यांचे १४ वे वंशज रणधीर जेधे यांना जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ ...

Shivchhanpati State Level Lifetime Achievement Award to Randhir Jedhe | रणधीर जेधे यांना शिवछञपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

रणधीर जेधे यांना शिवछञपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार कान्होजी नाईक जेधे यांचे १४ वे वंशज रणधीर जेधे यांना जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ इतिहास संशोधक विलास सोनवणे यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्कार तसेच विविध क्षेत्रांत प्रेरणादायी काम करणाऱ्यांना शिवसृष्टी प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहेत. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुलभैया लोणीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण १९ फेब्रुवारीला होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोरे पाटील परिवार आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण, रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक विलास सोनवणे (सातारा) यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Web Title: Shivchhanpati State Level Lifetime Achievement Award to Randhir Jedhe