शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

शिवाजीराव भोसले बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 7:00 AM

आरबीआयची कारणे दाखवा नोटीस : छाननीत ओढले गंभीर ताशेरे

ठळक मुद्देआर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने भोसले सहकारी बँकेवर घातले आर्थिक निर्बंध

विशाल शिर्के-  पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गंभीर ताशेरे ओढले आहेत. तसेच, बँकेचा परवाना रद्द करुन दिवाळखोरीची (लिक्विडेशन) कारवाई का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने भोसले सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. आरबीआयने ३१ मार्च २०१८ अखेरीस केलेल्या लेखापरीक्षणात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. तसेच, आरबीआयने मार्च २०१७ आणि मार्च २०१८ या वर्षातील ताळेबंदाची देखील तपासणी केली आहे. त्यात बँकेतील अनुत्पादक खात्यातील (एनपीए) रक्कम २३२ कोटी ७७ लाखा वरुन (५८.७० टक्के) ३१४ कोटी ९८ लाख रुपयांवर (८६.२० टक्के) पोहचली आहे. बँकेने नो युवर कस्टमर (केवायसी) च्या निर्र्देशांचे देखील पालन केलेले नाही. कॅपिटल टू रिस्क असेट रेशो (सीआरएआर) देखील अत्यंत खराब आहे. त्याचे प्रमाण उणे २३ कोटी ९२ लाख (उणे १०.७४ टक्के) आहे. बँकेची सद्य:स्थिती अत्यंत डळमळीत झाली असून, ही स्थिती सुधारण्यासाठी बँकेने कोणताही कृती कार्यक्रम सादर केलेला नाही. तसेच, इतर सक्षम बँकेत विलिनीकरणाचाही प्रस्ताव दिला नाही. या शिवाय, छाननी अहवालावर देखील बँकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बँकेकडे किमान भांडवलही नसल्याने, ते आपल्या ठेवीदारांने पैसे देऊ शकण्याच्या स्थितीत नाहीत. बँकेने व्यवसाय स्थापनेच्या उद्दीष्टांचे पालन केले नसल्याचे निरीक्षण आरबीआयने नोंदविले आहे. या स्थितीवरुनच बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेला नोव्हेंबर १९९६च्या कायद्यानुसार बँकींग व्यवसायाचा परवाना दिला आहे. हा परवाना रद्द करुन बँकेवर दिवाळखोरीची कारवाई का करु नये असे विचारण्यात आले आहे. तसेच, एक महिन्यात त्यावर उत्तर न दिल्यास आपले काही म्हणणे नसल्याचे मानून पुढील कारवाई करण्याचा इशाराही आरबीआयने दिला आहे. तसे, पत्र २४ आॉक्टोबर २०१९ रोजीच बजावण्यात आाले आहे. या पत्राची मुदत नुकतीच संपली आहे. त्यानंतर अजून आरबीआयने पुढील कार्यवाही केली नसली तरी, दिवाळखोरीची टांगती तलवार कायम आहे. ----------------बँकेच्या ताळेबंदातील ठळक तपशील (रक्कम कोटीत)

तपशील                                           ३१ मार्च २०१७        ३१ मार्च २०१८तोटा                                               २९.४९                           ६८.६९    ठेवी                                                ५३७.६०                        ४९४.०४ कर्ज                                               ३९३.५३                         ३६५.४१ ग्रॉस एनपीए रक्कम                       २३                                ३१४.९८टक्के                                             ५८.७०                           ८६.२०                    

टॅग्स :PuneपुणेbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिस