फ्रान्सिस दिब्रिटो यांना शिवाजीराव भोसले पुरस्कार

By Admin | Updated: July 5, 2017 03:49 IST2017-07-05T03:49:32+5:302017-07-05T03:49:32+5:30

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत

Shivajirao Bhosale Award for Francis Dibrito | फ्रान्सिस दिब्रिटो यांना शिवाजीराव भोसले पुरस्कार

फ्रान्सिस दिब्रिटो यांना शिवाजीराव भोसले पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह येथे १४ जुलै रोजी सायं. ६.०० वा. होणाऱ्या समारंभात डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आणि पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेचा घनिष्ठ संबंध होता. महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यात पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेचा समितीतर्फे या वर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Shivajirao Bhosale Award for Francis Dibrito