शिवाजीनगरमध्ये कोणाला धोबीपछाड
By Admin | Updated: September 26, 2014 05:41 IST2014-09-26T05:41:08+5:302014-09-26T05:41:08+5:30
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांच्या पक्षबदलाच्या चर्चेमुळे तसेच भाजपमध्ये सुरू
शिवाजीनगरमध्ये कोणाला धोबीपछाड
पुणे : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांच्या पक्षबदलाच्या चर्चेमुळे तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इच्छूक उमेदवारांच्या वादामुळे हा मतदारसंघ शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, आता निम्हण यांना कॉंग्रेसची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर मनसेनेही राजू पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता भाजप-सेनेकडून कोण उमेदवार येणार आणि या मतदारसंघात कोणाला धोबीपछाड पडणार हा विषय चर्चेचा ठरला आहे.
महायुती आणि आघाडी झाली नसल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह शहर कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांनी आधीच प्रचाराला सुरूवात केलेली आहे. शिवसेनेकडून प्रशांत बधे, विलास सोनवणे यांच्या नावांचा विचार केला जाऊ शकतो. अन्यथा इतर पक्षातील नाराजालाही संधी मिळू शकते.
भाजपला अंतर्गत वाद सोडवून या मतदारसंघात जम बसवावा लागणार आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची रांग आहे. त्यात प्रामुख्याने खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजिव सिध्दार्थ शिरोळे, माजी शहराध्यक्ष विकास मठकरी, मुरलीधर मोहोळ, निलिमा खाडे इच्छूक आहेत. तर शिरोळे यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दोन गटातच शहकटशहाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)