शिवाजी रस्त्यावर भरदिवसा चाकूच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST2021-02-27T04:12:08+5:302021-02-27T04:12:08+5:30
पुणे : भाजीपाला खरेदी करण्यासाठी मंडईकडे निघालेल्या व्यक्तीला चौघांनी भरदिवसा शिवाजी रस्त्यावर चाकूच्या धाकाने लुटले. दरम्यान संबधित व्यक्तीने ...

शिवाजी रस्त्यावर भरदिवसा चाकूच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न
पुणे : भाजीपाला खरेदी करण्यासाठी मंडईकडे निघालेल्या व्यक्तीला चौघांनी भरदिवसा शिवाजी रस्त्यावर चाकूच्या धाकाने लुटले. दरम्यान संबधित व्यक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला, पोटाला व पाठीला चाकू लावून जीवे ठार करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आनंद बाळू सोनावणे (वय २२, रा. राधोरी), प्रकाश वामन शिंदे (वय ३०, रा. टाकही मानुर, ता. पाथर्डी), नितीन हरी वेताळ (वय २२, रा. पर्वती पायथा), अर्जुन दमपा थापा (वय ३६, रा. शुक्रवार पेठ) या चौघांना अटक केली. याबाबत बापू सुदाम कांटे (वय ४७, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्यात चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी मंडईकडे निघाले होते. त्या वेळी शिवाजी रस्त्यावर आलेल्या चौघांनी फिर्यादी यांना अडवून जबरदस्तीने खिशातील अडीच हजार रुपये काढून घेतले. दरम्यान फिर्यादी यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांपैकी एकाने गळ्याला, दुसऱ्याने पोटाला, तर तिसऱ्याने पाठीला चाकू लावून जीवे ठार करण्याची धमकी दिली.