शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषदेच्या गुन्ह्याच्या तपासाची शिवाजी पवारांवर पूर्ण वेळ जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 14:26 IST

स्वारगेट सहायक आयुक्तपदी रवींद्र रसाळ यांची नियुक्ती : पोलीस आयुक्तांचे आदेश

पुणे : एल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने त्याच्या तपासासाठी पूर्ण वेळ पोलीस अधिकारी देण्याचा निर्णय शहर पोलीस दलाने घेतला आहे. या गुन्ह्यांचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना पूर्ण वेळ तपास करण्यासाठी इतर कामातून मोकळीक दिली आहे.  त्यांच्या जागी स्वारगेट सहायक आयुक्तपदी विशेष शाखेचे रवींद्र रसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी एल्गार परिषदेत भडकावू भाषणे दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करत असताना एल्गार परिषदेच्या आडून शहरात माओवादी विचार पसरविण्याचा हेतू असल्याचे निष्पन्न झाले. परिषदेच्या आयोजनासाठी माओवादी संघटनांकडून पैसा पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.  या प्रकरणी सुरुवातीला पुणे पोलिसांनी देशभरातील विविध शहरात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन जून मध्ये नागपूर, मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे घालून पाच जणांना अटक केली होती.  त्यांच्याकडे केलेल्या तपासात यामागील देशव्यापी कट पुढे आला. राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले. 

या प्रकरणात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, ई मेल, पेनड्रॉईव्ह, हार्ड डिक्स जप्त केल्या आहेत.  बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संपर्क करताना त्यांच्या थिंक टँकने कोड लॅग्वेजचा वापर केला आहे़  त्याशिवाय नुकताच अटक केलेल्यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे या न्यायालयातील तारखांना उपस्थित राहण्यासाठी पोलीस अधिका-यांना जावे लागणार आहे़  त्यामुळे या गुन्ह्याचा तपास बारकाईने व्हावा, यासाठी शिवाजी पवार यांना त्यांच्या कडील इतर जबाबदा-या काढून घेण्यात आली आहे.  त्यांना पूर्ण वेळ या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार