शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Shivaji Maharaj : राजनाथसिंहांच्या वक्तव्याचा निषेध, अमोल कोल्हेंनी सांगितला जाज्वल्य इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:07 IST

Shivaji Maharaj : संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

ठळक मुद्देसंरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

मुंबई - केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन आता वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणतेचा जाज्वल्य इतिहास सांगत खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केला होता.   

संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि जाज्वल्य इतिहास जगभर सांगण्याची गरजही व्यक्त केली. ''केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी केलेलं धक्कादायक विधान माध्यमातून माझ्या वाचनात आलं, या वक्तव्याचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक ठरले ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे,'' असं माझं प्रामाणिक मत असल्याचं कोल्हेंनी म्हटलं. 

महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगभर पोहोचवणे गरजेचं

आपण इतिहासाच्या पानांचा धांडोळा घेतला तर, सुरुवातीच्या काळात स्वराज स्थापनेच्या प्रयत्नांविषयी दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आधीच्याही दरबारात शहाजी महाराज यांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, ही स्वामीनिष्ठा त्यामागे होती हे सिद्ध होतंय. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट 1971 साली झाली, असा ऐतिहासिक दाखला सापडते, त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वाला आलं होतं, असा इतिहास कोल्हे यांनी सांगितला. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी जे विधान केलं. ते चुकीच्या माहितीमुळे किंवा चुकीच्या फीड्समुळे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, यामुळे आपला जाज्वल्य इतिहास नि:पक्ष आणि तर्कसंगतीने देशभर, जगभर सांगण्याची गरज वाटते, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेRajnath Singhराजनाथ सिंहShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPuneपुणे