मंचर येथे शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:51+5:302021-04-03T04:09:51+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवराय उत्सव समितीच्या माध्यमातून किल्ले शिवनेरी ते मंचर पायी शिवज्योत आणण्यात आली. त्याचे स्वागत मंचर ...

मंचर येथे शिवजयंती उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवराय उत्सव समितीच्या माध्यमातून किल्ले शिवनेरी ते मंचर पायी शिवज्योत आणण्यात आली. त्याचे स्वागत मंचर शहराचे सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले यांनी केले.
शिवचरित्र या पुस्तकाच्या एक हजार प्रती, एक हजार मास्क, एक हजार सॅनिटायझरच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. या वेळी मंचरचे सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, युवा नेते श्याम गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य सतीश बाणखेले, अरुण बाणखेले, कैलास गांजाळे, खालिद इनामदार, पिंटू लोंढे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष धनेश बाणखेले अवधूत बाणखेले,मनोज लोखंडे,दिलावर मीर, सागर पिंगळे,बब्बू मीर, साहिल सय्यद,उपेंद्र गाडे, रुपेश काळे, आनंद थोरात,महेश हरिहर, रिझवान इनामदार, मुद्दसर मीर,सैफ अली मीर ,हर्षल राजगुरू,सूरज धरम,रावी अब्बास मीर, ऋषिकेश थोरात यांनी केले. शिवराय उत्सव समितीचे आणि धनेशभाऊ बाणखेले युवा मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
०२मंचर