बिबवेवाडी परिसरात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:20+5:302021-02-20T04:30:20+5:30
................................................................................ बिबवेवाडी येथील पोकळेवस्तीमध्ये अखिल पोकळेवस्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तर छत्रपती ...

बिबवेवाडी परिसरात शिवजयंती उत्साहात
................................................................................
बिबवेवाडी येथील पोकळेवस्तीमध्ये अखिल पोकळेवस्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची परिसरातील महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश पोकळे व भाग्यजित शेलार यांनी केले होते.
.............................................................................
श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील पुतळ्यास आज कष्टकरी घटकांच्या वतीने डॉ. बाबा आढाव व विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कष्टकरी विद्यालयातील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुंदर भाषण केले. या वेळी हमाल पंचायत, कामगार युनियन, तोलणार संघटना, स्वच्छ, पथारी पंचायत आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी लहान मुलांना व विद्यार्थ्यांना बाबांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला.
................................................................................
प्रेमनगर वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यसरकारच्या सूचनांचा आदर ठेवत अत्यंत साध्या पद्धतीने मिरवणूक न काढता शिवजयंती साजरी केली. या वेळी सुगत दसाडे, संजय दामोदरे, बल्ली झुंबरे, अनिल गायकवाड, प्रमोद संचेती, सुनील कांबळे, अर्जुन दसाडे, ज्येष्ठ नागरिक व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
..............................................................................
आंबेडकरनगर वसाहतीमध्येदेखील शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आला. या वेळी महिला कार्याध्यक्षा मृणालिनी वाणी, गणेश दामोदरे, मदन वाणी, किस्मतसिंह टाक आणि आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संजय दामोदरे यांनी केले.
................................................................................
फोटो ओळ:- मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शिवजयंतीनिमित्त फेटा बांधण्यात आला होता.