वेल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:07+5:302021-02-20T04:30:07+5:30
पंचायत समितीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्या पुष्पहार ...

वेल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
पंचायत समितीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पंचायत समितीचे सभापती
दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी
जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, वेल्ह्याचे सरपंच संदीप नगिने, माजी सरपंच संतोष मोरे, सुनील भुरुक,
रवींद्र पवार, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन ढुके, माजी उपसभापती प्रकाश पवार, खंडू गायकवाड, दीपक गायकवाड
आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वेल्हे मेंगाई मंदिरासमोर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्या हस्ते शिवरायांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या वेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष खुळे, उपाध्यक्ष सुनील वेगरे, रविराज गायकवाड, गोरक्ष भुरुक,,
नानासो शिंदे, माजी उपसरपंच विकास गायखे, संतोष बोराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी
अध्यक्ष शंकरनाना भुरुक, प्रदीप मरळ, मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, शिवसेनेचे सुशांत भोसले आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.
पंचायत समिती (ता. वेल्हे) शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य
अमोल नलावडे व इतर.