शिवारात बिबट्याचा कालवडीवर हल्ला
By Admin | Updated: February 23, 2017 02:31 IST2017-02-23T02:31:32+5:302017-02-23T02:31:32+5:30
येथील रायकरवाडी शिवारात बिबट्याने कालवडीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना

शिवारात बिबट्याचा कालवडीवर हल्ला
पिंपळवंडी : येथील रायकरवाडी शिवारात बिबट्याने कालवडीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. २१) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळवंडी परिसरात असलेल्या वाड्या-वस्त्यांवर असलेल्या जनावरांच्या गोठ्यांवर बिबट्याचे सातत्याने हल्ले होत आहेत. येथील घाटीकमळा शिवारात दोन दिवसांपूर्वी अंकुश काकडे यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला होता; तर दुसरी शेळी गंभीर जखमी झाली असून ती मरणावस्थेत आहे. तर एका मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून तीन मेंढ्यांचा फडशा पाडला. या दोन घटना ताज्या असतानाच येथील शेतकरी बन्सी बबन वाव्हळ या शेतकऱ्याच्या घराशेजारीला गोठ्यात बिबट्याने घुसून कालवडीवर हल्ला केला.