शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका?
By Admin | Updated: October 19, 2014 23:02 IST2014-10-19T23:02:25+5:302014-10-19T23:02:25+5:30
एकेकाळी मुंबईनंतर पुणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता; परंतु गेल्या २० वर्षांत शिवसेनेची ताकद कमी होत गेली.

शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका?
पुणे : एकेकाळी मुंबईनंतर पुणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता; परंतु गेल्या २० वर्षांत शिवसेनेची ताकद कमी होत गेली. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच असे झाले आहे, की शहरातील आठही मतदारसंघांत शिवसेनेला एकही जागा राखता आली नाही.
राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता १९९५ मध्ये आली होती. त्या वेळी पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक तीन जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. मात्र, १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा एक जागा कमी झाली. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत पुन्हा आणखी एक जागा कमी झाली. केवळ शिवाजीनगरमध्येच विनायक निम्हण विजयी झाले होते. त्यानंतर पालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत २० असलेली नगरसेवकांची संंख्या २०१२ च्या निवडणुकीत १५ झाली. त्यानंतर पहिल्यांदाच शहरात आठही जागांंपैकी एकही शिवसेनेचा आमदार निवडून आला नाही. (प्रतिनिधी)