इंधन दरवाढ विरोधात शिवसेनाचा आळंदीत एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:19 IST2021-02-06T04:19:37+5:302021-02-06T04:19:37+5:30

आळंदी शहरात आज महाद्वार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी शहरप्रमुख अविनाश तापकीर यांच्या नेतृत्वात आंदोलन ...

Shiv Sena's Alandi Elgar against fuel price hike | इंधन दरवाढ विरोधात शिवसेनाचा आळंदीत एल्गार

इंधन दरवाढ विरोधात शिवसेनाचा आळंदीत एल्गार

आळंदी शहरात आज महाद्वार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी शहरप्रमुख अविनाश तापकीर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर, नगरसेवक तुषार घुंडरे, शिवसेना जेष्ठ नेते उत्तम गोगावले, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर,माजी नगरसेवक आनंद मुंगसे, तुषार नहार, मदन घुंडरे, अमित डफळ, आशिष गोगावले, बाप्पु मुंगसे, शशि जाधव, मंगेश तिताडे, राहुल गोरे, बालाजी शिंदे, अनिकेत डफळ, राहुल सोमवंशी, मंगल हुंडारे, संगीता फपाळ, निखिल तापकीर, संदीप कायस्थ तसेच सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनामुळे जगणे कठीण झालेले असताना सतत होत असलेली इंधन दरवाढ म्हणजे सामान्य जनतेवरचा अन्याय असल्याचे अविनाश तापकीर यांनी म्हणणे व्यक्त केले.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत इंधन दरवाढ विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलून आंदोलन केले.

Web Title: Shiv Sena's Alandi Elgar against fuel price hike