शिवसेना विकासरथ हाती घेणार
By Admin | Updated: February 13, 2017 02:21 IST2017-02-13T02:21:44+5:302017-02-13T02:21:44+5:30
खराडी-चंदननगर प्रभाग ४ मधील शेजवळ पार्क, बोराटेवस्ती, तुकारामनगर या भागांसाठी एक रुपयाचेही भरीव काम झाले नसल्याने परिसर बकाल झाला आहे.

शिवसेना विकासरथ हाती घेणार
चंदननगर : खराडी-चंदननगर प्रभाग ४ मधील शेजवळ पार्क, बोराटेवस्ती, तुकारामनगर या भागांसाठी एक रुपयाचेही भरीव काम झाले नसल्याने परिसर बकाल झाला आहे. कचरा, मोकाट डुकरे, ड्रेनेज, उखडलेले रस्ते, पिण्याच्या पाण्यात सांडपाणी, आरोग्य प्रश्न या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. शिवसेना हे प्रश्न सोडवून विकासरथ हाती घेणार आहे. यासाठी संतोष भरणे, संध्या पठारे, सुनील थोरात व मीनाक्षी सुरेश शेजवळ यांनी संधी देण्याचे आवाहन संतोष भरणे यांनी केले.
शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधून परिसराच्या विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आव्हान केले.
याप्रसंगी धीरज पठारे, गुलाब पठारे, कानिफ भरणे, सुरेश शेजवळ, मंगेश गायकवाड, अक्षय साबळे, संदीप खुळे, प्रसाद शेजवळ, दादा पठारे, विजय चव्हाण, कृष्णा मोरे, सतीश पठारे, अनिल भुजबळ, विजय दौंडकर, तृप्तीताई भरणे, अविधा थोरात, सुनीता जाधव, सारिका शिंदे, सुजाता आतकरे, सुजाता नाईक, सई भरणे, ज्ञानेश्वरी भरणे यांनी मतदारांशी संवाद साधला.