शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार : कदम
By Admin | Updated: January 25, 2017 23:59 IST2017-01-25T23:59:12+5:302017-01-25T23:59:12+5:30
शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार असल्याची माहिती पुणे जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम यांनी दिली. जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी

शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार : कदम
उरुळी कांचन : शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार असल्याची माहिती पुणे जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम यांनी दिली.
जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी चालू असताना व भाजपा शिवसेना यांच्यातील युती अद्याप वास्तवात येत नसल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मनात मित्रपक्षाबद्दल तीव्र नाराजीचा सूर आहे. यामुळे बुधवारी सकाळी पूर्व हवेलीमधील ५ जिल्हा परिषद गट व ११ पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या पुढे ती भूमिका मांडण्याची जबाबदारी श्रद्धा कदम, राजेंद्र पायगुडे, काळूराम मेमाणे, बाळासाहेब कांचन, काका कुंजीर, रमेश भोसले, सविता कांचन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बैठकीसाठी उपतालुका प्रमुख विजय बगाडे विभागप्रमुख स्वप्निल कुंजीर, राजेंद्र बोरकर, लाला तुपे, रमेश कांचन, मच्छिंद्र नरुटे, अप्पा कड, श्रीकांत मेमाण आदी उपस्थित होते.